भाऊ-बहिणीत होणार राजकीय संघर्ष! काँग्रेसने वायएस शर्मिला यांच्याकडे दिली मोठी जबाबदारी

भाऊ-बहिणीत होणार राजकीय संघर्ष! काँग्रेसने वायएस शर्मिला यांच्याकडे दिली मोठी जबाबदारी

YS Sharmila : वायएसआर तेलंगणा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्यानंतर वाय.एस. शर्मिला (YS Sharmila) यांच्याकडे काँग्रेस हायकमांडने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आंध्रचे विद्यमान मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांच्या त्या बहीण आहेत. वाय.एस. शर्मिला यांनी 4 जानेवारी रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांच्याकडे काँग्रेस पक्ष नवी जबाबदारी देऊ शकते, अशी चर्चा होती.


तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला

वाय.एस. शर्मिला यांनी तेलंगणामध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा एकही उमेदवार उभा करण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यावेळी शर्मिला म्हणाल्या होत्या की, सर्व सर्वेक्षणे आणि ग्राउंड रिअॅलिटी दाखवते की तेलंगणा विधानसभेची निवडणूक काँग्रेस जिंकत आहे.

अशा स्थितीत त्यांचा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर काँग्रेसची मते कमी होतील आणि त्याचा फायदा बीआरएसला होईल. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. तेव्हापासून चर्चा होती की वाय.एस. शर्मिला यांना काँग्रेस मोठे बक्षीस देऊ शकते.

संवैधानिक संस्थावर विश्वास नाहीतर संविधानावर कसा? नार्वेकरांचा उद्धव ठाकरेंना खडा सवाल

कोण आहेत वायएस शर्मिला?
वाय.एस. शर्मिला या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन रेड्डी यांची बहीण आणि युनायटेड आंध्र प्रदेशचे काँग्रेसचे मुख्यमंत्री दिवंगत वायएसआर यांची मुलगी आहेत. 2012 मध्ये जगन मोहन रेड्डी यांनी अचानक काँग्रेस सोडली आणि संयुक्त आंध्र प्रदेशमध्ये YSRCP ची स्थापना केली होती. त्यांच्यासोबत 18 आमदारही काँग्रेसपासून वेगळे झाले होते. काही दिवसांनी जगन मोहन रेड्डी यांना भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांची आई वायएस विजयम्मा आणि बहीण वायएस शर्मिला यांनी नवीन पक्ष सुत्र आपल्या हाती घेतली होती.

टगे आणि खाटकांच्या तावडीत महाराष्ट्राची कारखानदारी; सदाभाऊ खोतांचा दोन्ही पवारांवर घणाघात

वायएसआरसीपीने निवडणुका जिंकल्या. पुढे जगन मोहन रेड्डी मुख्यमंत्री झाले आणि इथूनच दोन भावा-बहिणींमध्ये वाद निर्माण होऊ लागले. 2021 मध्ये, वायएस शर्मिला यांनी मीडियासमोर कबूल केले की त्यांचे भावासोबत राजकीय मतभेद आहेत. जुलै 2021 मध्येच त्यांनी YSR तेलंगणा पक्षाची स्थापना केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube