‘सर्वोच्च न्यायालयाने गोगावलेंची नियुक्ती अवैध ठरवलीच नाही’; नार्वेकरांनी SC च्या निकालातलं खरं सांगितलं

‘सर्वोच्च न्यायालयाने गोगावलेंची नियुक्ती अवैध ठरवलीच नाही’; नार्वेकरांनी SC च्या निकालातलं खरं सांगितलं

Rahul Narvekar : ‘सर्वोच्च न्यायालयाने गोगावलेंची नियुक्ती वैध ठरवलीच नाही’, असा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) केला आहे. ठाकरे गटाने (Thackeray Group) वरळीत जनता न्यायालय घेत पत्रकार परिषद घेत राहुल नार्वेकरांच्या निकालावर सडकून टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांची नियुक्ती अवैध ठरवल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यानंतर राहुल नार्वेकरांनीही पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचून ठाकरे गटाला सुनावलं आहे.

शिवसेनेचा निकाल त्यांची बायकोही मान्य करणार नाही, संजय राऊतांचा नार्वेकरांवर हल्लाबोल

राहुल नार्वेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात पान नं 97 परिच्छेद 122, परिच्छेद 119, पान नं 97 परिच्छेद 124, पान नं 139 परिच्छेद 206 डीमध्ये ज्यावेळी आपण व्हिपला नियुक्ती देत असतो, गटनेत्याला देत असतो तेव्हा अध्यक्षांनी तो निर्णय राजकीय पक्षाची भूमिका समजून त्याच व्यक्तीला रेकिगनेशन देणं आवश्यक आहे. 21 जून 22 रोजी विधानसभा अध्यक्षांनी अजय चौधरींच्या नियुक्तीला आणि सुनिल प्रभू यांच्या नियुक्ताीला मान्यता दिली. त्यावेळी ठाकरेंचं एकच पत्र अध्यक्षांसमोर होतं. पक्षात फुट पडली असा पुरावा त्यांच्यासमोर नव्हता म्हणून आलेलं पत्र राजकीय पक्षाची भूमिका समजून जो निर्णय दिलायं तो योग्य कारण ती भूमिका राजकीय पक्षाची असल्याचं ग्राह्य धरुन निर्णय दिला असल्याचं निकालात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याचं नार्वेकरांनी सांगितलं आहे.

तसेच 3 तारखेला विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला तेव्हा अध्यक्षांसमोर राजकीय पक्षांच दोन गट होते. एक उद्धव ठाकरे गट आणि दुसरा एकनाथ शिंदे याचा अर्थ अध्यक्षांना दोन गट पडल्याची कल्पना होती. त्यामुळे अध्यक्षांनी रेकिगनेशन देताना राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवल्याशिवाय निर्णय दिला त्यामुळे तो निर्णय अमान्य आहे. त्याचप्रमाणे मूळ पक्ष कोणाचा हे आधी तपासून व्हिप आणि अपात्र आमदार प्रकरणावर निकाल द्यावा असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना असल्याचं नार्वेकरांनी सांगितलं आहे.

Kanni New Poster : मकर संक्रांत अन् पतंग उडवण्याचा आनंद लुटत, ‘कन्नी’चे नवीन पोस्टर झळकले!

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामध्ये भरत गोगावले यांची नियुक्ती कायमस्वरुपी अवैध असल्याचं म्हटलेलं नाही. तर अजय चौधरी आणि सुनिल प्रभू यांची निवड बरोबर असं सर्वोच्च न्यायालयाने कधीच सांगितलं नाही. मूळ राजकीय पक्षाची भूमिका काय आहे हे समजून न घेताच निर्णय दिला आहे त्यामुळेच तो निर्णय अयोग्य आहे, पण मूळ राजकीय पक्ष कोणाचा हे आधी अध्यक्षांना ठरवू द्या मगच निर्णय घ्या, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याचं नार्वेकरांनी सांगितलं.

मी आधी मूळ राजकीय पक्ष कोणता हा निर्णय घेतला त्यानंतर त्या राजकीय पक्षाची इच्छा काय आहे त्यांचा व्हिप कोण आहे त्याला नियुक्ती दिली असल्याचं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे. काही लोकांकडून जनतेत गैरसमज पसरवला जात आहे. त्यामुळे जनतेला काय खरं खोटं हे समजणं आवश्यक असून तेच सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद घेत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube