Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल टीमचा चीनकडून 5-1 असा पराभव झाला आहे. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला चीनविरुद्ध एकच गोल करता आला. हांगझू येथील हुआंगलाँग स्पोर्ट्स सेंटर स्टेडियमवर दोघांमधील हा सामना खेळला गेला. भारतीय फुटबॉल संघ 2014 नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी मैदानात उतरला होता, मात्र सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची सुरुवात […]
Anantnag Encounter : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाने मोठे यश मिळवले आहे. सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी उझैर खानचा खात्मा केला आहे. काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, अनंतनागमध्ये दहशतवादी उझैर मारला गेला आहे. मृतदेहाचा शोध सुरू असून तो दहशतवाद्याचा असू शकतो. त्यामुळे शोध मोहीम सुरूच राहणार आहे. या कारवाईत चार जवानही शहीद […]
Gadar 2 OTT Release: सनी देओलचा चित्रपट गदर 2 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी बॉक्स ऑफिसवर धमाका सुरुच आहे. अनिल शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या गदर 2 ला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला […]
Women Reservation Bill: मिशन-2024 च्या तयारीला लागलेल्या भाजपने महिला आरक्षण देण्याचा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 33 टक्के महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसदेत या विधेयकाची घोषणा केली. आता हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर कायद्यात रुपांतर होईल. महिला आरक्षण विधेयक 27 वर्षांपासून चर्चेत 1996 मध्ये एचडी देवेगौडा […]
Kantrati nokar bharti gr : राज्य सरकारने नुकतेच 6 सप्टेंबरला राज्य शासनातील महत्त्वाच्या अधिकारी पदासह कार्यालयातील अनेक महत्त्वाची पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा शासन निर्णय काढला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने आज अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सलीमठ यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत शहर […]
Dhangar reservation : आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून धनगर समाजाकडून चौंडी येथे आंदोलन सुरु आहे. यातच गेल्या चौदा दिवसांपासून उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सरकारकडून आरक्षण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रूपनवर यांनी केला आहे. मात्र आता उपोषणकर्ते रुपनवर यांनी आक्रमक पवित्रा घेत प्राणत्याग करण्याचा […]
Hardeep Singh Nijjar: कॅनडाने भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला आहे. एका उच्चपदस्थ भारतीय अधिकाऱ्याला देश सोडण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी भारतानेही ‘ईंट का जवाब पत्थर से’ देत प्रत्युत्तर दिले आहे. काही तासांनंतरच कॅनडाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला देश सोडण्याचे आदेश दिले. परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली आहे. […]
Sadananda More resigned : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा डॉ. सदानंद मोरे यांनी दिला आहे. साहित्य साहित्य संस्कृती मंडळाची स्वायत्तता काढून त्याला शासकीय स्वरुप घेण्याचा घाट शासन दरबारी होता, असा आरोप त्यांनी केला आहे. मी मंत्र्यांकडे राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली आहे. कारण गेल्या काही दिवसांत साहित्य संस्कृती मंडळाच्या कारभार प्रशासनाचा कामापेक्षा जास्त हस्तक्षेप […]