मुंबई : अनेक प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने आज सोमवार, २ जानेवारीपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे नव्या वर्षात आरोग्यसेवा कोलमडण्याचा धोका निर्माण झाला आहे. संप अशा काळात पुकारण्यात आला जेव्हा पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. दरम्यान ही स्थिती टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीने […]
शिर्डी : नववर्षानिमित्त बेंगलोर येथील दानशुर साईभक्त राजा दत्ता व सौ.शिवानी दत्ता यांनी 928 ग्रॅम वजनाचा 46 लाख 70 हजार 624 रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिला आहे. दत्ता दाम्पत्यांनी हा सुवर्ण मुकुट संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे सुपुर्त केला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षीच म्हणजे 2022 मध्ये […]
मुंबई : सत्तेसाठी आमदार फोडून 56 वर्षांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, आपली अस्मिता असलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवले असे म्हणत शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. येणारे नवीन वर्ष हे अन्याय सहन करण्याचे नाही. आपल्या रक्ताच्या थेंबा-थेंबात आक्रोश आहे. तो तसाच उफाळून दे.. कारण या आक्रोशाची आज महाराष्ट्राला आणि उद्धव बाळासाहेब […]
मुंबई : कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर जगभरातील लोकांनी अत्यंत जल्लोषात नाचतगात नववर्षाचं स्वागत केलं. या सरत्या वर्षी तळीरामांनी देखील आपली इच्छा मनसोक्त पूर्ण केल्याचे दिसून आले. चालू आर्थिक वर्षामध्ये मद्याच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून सरकारी तिजोरीत चांगलीच भर पडली आहे. कोरोना काळात अर्थव्यवस्थेचे चाक लॉकडाउनमध्ये रुतल्याने सरकारसमोर महसूलाचा प्रश्न निर्माण झाला होता. आता, कोरोनानंतर […]
नवी दिल्ली : देशात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून LPG खरेदी करणे लोकांसाठी महाग झाले आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली असून, त्यानंतर दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 1769 मध्ये उपलब्ध आहे. रविवारपासून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ झाली आहे. यानंतर देशभरात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, घरगुती […]
मुंबई : राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर जाणार आहेत. शनिवारपर्यंत वेळ देऊन देखील चर्चेचे निमंत्रण न मिळाल्याने उद्यापासून संपावर जाण्याच्या निर्णयावर ‘मार्ड’ ठाम आहे. त्यामुळे राज्यभरातील पाच हजारांहून अधिक डॉक्टर संपावर जाणार आहे. यामुळे नवीन वर्षाच्या सुरवातीलाच आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. दरम्यान मार्डने काही दिवसांपूर्वीच आपल्या मागण्या प्रशासन, सरकारसमोर मांडत संपावर जाण्याचा इशारा दिला […]
पुणे : भीमा कोरेगावची लढाई ही पुणे जिल्ह्यामधील भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई 1 जानेवारी, इ.स. 1818 रोजी झाली होती. दरम्यान या ठिकाणी आज 205 वा शौर्य दिन साजरा होत आहे. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा इथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे. या शौर्य दिनानिमित्त विजय […]
नागपूर : नागपूरच्या महाल परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोनद्वारे ही धमकी दिली. या घटनेनंतर पोलिसांकडून संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तत्कालीन भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर […]
संभाजीनगर : शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याने एका केटरिंग व्यावसायिकाला हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीये. वाढदिवसाच्या पार्टीचं शिल्लक बिल मागण्यासाठी सदर व्यावसायिकाने सिद्धार्थ याला फोन केला असता धमकी देण्यात आली आहे. दरम्यान याबाबत सविस्तर माहिती अशी, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी 2017 साली आपल्या पुत्राच्या वाढदिवसाच्या […]
नवी दिल्ली : पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आता सौदी अरेबियाच्या अल-नासर एफसीकडून खेळताना दिसणार आहे. क्रिस्टियानो रोनाल्डोने 2025 पर्यंत क्लबशी करार केला आहे. अडीच वर्षांच्या या करारात त्यांना 200 दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे 1800 कोटी वार्षिक मिळणार आहेत. अल-नासर एफसीने ख्रिस्तियानो रोनाल्डोसोबत झालेल्या कराराची माहिती देणारा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये रोनाल्डो […]