- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
शिंदे गटात ‘इनकमिंग’ सुरूच
परभणी : जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा, पालम येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तसेच राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 नगरसेवकांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार मार्गक्रमण करताना सध्या अनेक लोक येऊन पक्षाला जोडली जात आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील […]
-
माझा घातपात होऊ शकतो, अंधारेंचा गौप्यस्फोट
चंद्रपूर : ठाकरे गटाची धडाडणारी तोफ म्हणून नावाजलेल्या सुषमा अंधारे या नेहमीच आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जात. नुकतेच त्यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. माझा घात-अपघात होऊ शकतो, अशी भीती शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे. तसेच अंधारे म्हणाल्या, तुमच्या मागे चौकशी लावण्यासारखं काही नसल्याने तुमचा अपघात होऊ शकतो, अशी माहिती […]
-
श्रीलंकेचा भारतावर 16 धावांनी विजय, मालिकेत बरोबरी
मुंबई : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात श्रीलंकेने भारताचा 16 धावांनी पराभव केला. भारतासमोर विजयासाठी 207 धावांचे लक्ष्य होते, मात्र टीम इंडियाला निर्धारित षटकात 8 विकेट गमावून 190 धावाच करता आल्या. श्रीलंकेला भारताच्या भूमीवर 6 वर्षांनंतर विजय मिळाला. भारताकडून अक्षर पटेलने 31 चेंडूत सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. त्याने सूर्यकुमार यादवसह […]
-
भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली दिल्ली
नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, त्याचे केंद्र अफगाणिस्तानमधील फैजाबाद होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 होती आणि ती संध्याकाळी 7.55 वाजता आली. सध्या कोठूनही कोणत्याही प्रकारची हानी झाल्याची माहिती नाही. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा, फरिदाबाद आणि गुरुग्राममध्ये लोकांना […]
-
शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; पाचवीसह आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर
मुंबई : राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल मंगळवारी रात्री उशीरा जाहीर करण्यात आला. त्यानुसार इयत्ता पाचवीचे 23.90 टक्के विद्यार्थी, तर आठवीचे 12.53 टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे राज्यभरातील इयत्ता पाचवीच्या एकूण 3, 82, 797 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 91,400 विद्यार्थी पात्र झाले. आठवीची परीक्षा 2,79,466 विद्यार्थ्यांनी दिली होती. […]
-
महावितरणचे अधिकारी, कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर, कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा
मुंबई : महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिलीय. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारलाय. तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळं राज्यातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास, मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यातच संप करणाऱ्या […]
-
नामांतराला विखेंचा ‘नो’, पडळकरांना सुनावले
अहमदनगर : जिल्ह्याचा नामांतराचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जिल्ह्याचे नामांतर व्हावे अशी मागणी जिल्ह्याबाहेरील काही नेते मंडळी करू लागले आहे. आता याच नामांतराच्या विषयावरून राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपले मत मांडले आहे. यावेळी बोलताना विखे म्हणाले, नामांतराचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाहीये. औरंगाबादला संभाजीनगर करा अशा चर्चा आजवर आपण […]
-
भाजपचे आजचे आंदोलन म्हणजे फक्त धुळफेक
मुंबई : राज्यात सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर करण्यात आलेल्या वक्तव्यावरून राजकीय आरोप – प्रत्यारोप होऊ लागले आहे. यातच भाजपकडून आंदोलने देखील करण्यात येत आहे. भाजपच्या या आंदोलनाचा राष्ट्रवादीने चांगलंच समाचार घेतला आहे. ज्यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास माहित नाही… अजित पवार काय म्हणाले हे माहीत नाही… आपण कशासाठी आंदोलन करत आहोत हे माहीत […]
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला अयोध्याचे महंत आले होते. त्यांनी शिंदे यांना अयोध्या येण्यासाठी आमंत्रण दिले. यावर आपणही लवकरच अयोध्येला जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, अयोध्या आमचा प्रेरणा स्थान आहे. अयोध्या हा श्रध्देचा विषय आहे, आम्ही नक्कीच अयोध्याला […]
-
झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला
मुंबई : पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला असल्याची भावना व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम केले. राजकीय, सामाजिक जीवनात त्यांनी केलेले काम […]










