नवं वर्षाच्या सुरुवातीलाच व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्या

नवं वर्षाच्या सुरुवातीलाच व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्या

नवी दिल्ली : देशात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून LPG खरेदी करणे लोकांसाठी महाग झाले आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली असून, त्यानंतर दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 1769 मध्ये उपलब्ध आहे.

रविवारपासून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ झाली आहे. यानंतर देशभरात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही आणि किंमत तशीच आहे, ही दिलासादायक बाब आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यानंतर राजधानी दिल्लीत 1769 रुपये, कोलकात्यात 1870 रुपये, मुंबईत 1721 रुपये आणि चेन्नईमध्ये 1917 रुपयांना मिळत आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी केली होती.

सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. 6 जुलै 2022 रोजी 14.2 किलो घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल झाला होता. त्यावेळी भावात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. दिल्लीत 1053 रुपये, मुंबईत 1052.5 रुपये, कोलकात्यात 1079 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.5 रुपयांना घरगुती सिलिंडर उपलब्ध आहे.

सरकारने 2022 मध्ये घरगुती सिलिंडरच्या किमतीत चार वेळा वाढ केली होती आणि एकूण 153.50 रुपयांची वाढ केली होती. 22 मार्च रोजी 50 रुपये, 7 मे रोजी 50 रुपये आणि 19 मे आणि जुलै 50 रुपयांनी 3.5 रुपयांनी वाढ करण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube