30 मे रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक महत्वाचं निर्णय म्हणजे राज्यात लवकरच नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण राबविण्यात येणार आहे.या नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणात ९५ हजार कोटींची नवीन गुंतवणूक आकर्षित करण्याच उद्दीष्ट सरकारने ठेवले आहे. गतीमान शिंदे-फडणवीसांची नवी IT पॉलिसी नेमकी कशी? सविस्तर जाणून घ्या…
निळवंडे धरणातील पाणी सोडण्याची आज चाचणी पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी या धरणाच्या श्रेयवादावरून दोन नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोप केले जात आहे. नेमकं काय आहे या धरणाचा इतिहास व का हा प्रकल्प एवढी वर्ष रखडला ते आपण जाणून घेऊ…
जेजुरी गड सध्या वादाच्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. याचं कारण ठरलयं ते मार्तंड देवस्थान विश्वस्त समितीवरील विश्वस्त निवडीचा वाद. या विश्वस्त निवडीच्या विरोधात जेजुरीकर प्रचंड आक्रमक झाले असून शुक्रवारपासून रस्त्यावर उतरले आहेत. रास्ता रोको, चक्रीय उपोषण अशी आंदोलनं सुरु आहेत. आता महाराष्ट्राच्या विधानभवनावरही हे पिवळं वादळ धडकरणार आहे.
ही कथा अशा एका बाबाची आहे ज्याला लोक देव मानत असतात. पण त्याने आपल्या भक्तावर मात्र अन्याय केला आहे. हा सिनेमा आपल्या अल्पवयीन मुलाला न्याय मिळवून देणाऱ्या वकिलाबद्दल आहे.
अवघ्या चारच दिवसात एकामागे एक सहा कलाकारांचे निधन झाले. कुणाचा अपघात झाला तर कुणाला बाथरूम मध्ये घसरून पडल्यामुळे जीव गमवावा लागला तर कुणाचं आजारपणामुळे निधन झाले मृत्यू झालय. विशेष बाब म्हणजे या निधन झालेल्या कलाकारापैकी सहाच्या सहा कलाकार हे टीव्ही मनोरंजन विश्वातील आहेत. हे सहा कलाकार कोणते ते जाणून घ्या.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळवण्यासाठी राज्य सरकारने आता नवीन सुविधा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत नागरिकांना निधी मिळवण्यासाठी मिस्ड कॉलचा पर्याय आता उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ नक्की पहा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकाराला 26 मे रोजी नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने लेट्सअप मराठीने मोदींच्या गेल्या 9 वर्षातल्या कारकिर्दीवर खास सिरीज सुरु केली आहे. आजच्या भागाचा विषय आहे, नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातील नऊ मोठे वक्तव्ये. जाणून घ्या कोणती आहेत ते.
काँग्रेसची सत्ता जाऊन 2014 मध्ये देशात मोदी सरकार स्थापन झाले. मोदी सरकार सत्तेत येऊन 26 मे रोजी 9 वर्ष पूर्ण होत आहेत. या काळात केंद्राने अनेक योजना आणल्या. त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
डिसेंबर महिन्यापासून अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठीचा हिरवा कंदील आता सुप्रीम कोर्टाच्या घटनापिठाने दाखवलाय. डिसेंबर महिन्यात, बैलगाडा शर्यतीवरील बंदी या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली होती मात्र सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. अखेर आज यासंदर्भातला निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असून त्यानुसार महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, तामिळनाडूमधील जल्लीकट्टू आणि कर्नाटकमधील कम्बाला या खेळांना कायदेशीर […]
पुरंदर तालुक्यातील माजी आमदार अशोक टेकवडे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी त्यांची सडेतोड मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मनातली व्यथा सांगितली.