Abhishek Kapoor चार वर्षांनी करणार कमबॅक; ‘या’ चित्रपटाचं करणार दिग्दर्शन
Abhishek Kapoor : दिग्दर्शक अभिषेक कपूर ( Abhishek Kapoor) तब्बल चार वर्षांनी चित्रपट दिग्दर्शनात पुनरागमन करणार आहेत. ‘शराबी’ या नव्या चित्रपटाचं दिग्दर्शन ते करणार आहेत. अलीकडेच अजय देवगण, आमन देवगण आणि राशा थडानी अभिनीत त्याच्या नवीन प्रोजेक्टचे चित्रीकरण पूर्ण केल असून याच दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केलं.
‘सरकारकडून माझ्यावर ट्रॅप लावला जातोय’; मुंबईतील आंदोलनाआधी जरांगेंचा गंभीर आरोप
या नव्या चित्रपटाने चाहत्यांमध्ये उत्कंठा निर्माण केली आहे. नुकतेच पूर्ण झालेला अजून एका नाव समोर न आलेला प्रकल्प आणि आगामी ‘शराबी’ या दोन नव्या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.’रॉक ऑन!!’, ‘काई पो चे!’, ‘केदारनाथ’, आणि ‘चंदीगढ करे आशिकी’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांमध्ये अभिषेक कपूर याने आपल्या दिग्दर्शनाची जादू दाखवून दिली. दिग्दर्श नाची अनोखी पारख असलेल्या या दिग्दर्शकाने कायम आपल्या हटके कथानी प्रेक्षकांना मोहित केलं आहे.
कोल्हापूर-हातकणंगले शिवसेनेलाच! हसन मुश्रीफांची घोषणा; महायुतीचे ‘पिक्चर क्लिअर’?
अभिषेक कपूर तब्बल चार वर्षांच्या संयमाने पुन्हा एकदा बॅक टू अँक्शन बघायला मिळणार आहे. ‘शराबी’च कुतूहल वाढत असताना हा चित्रपट 1984 च्या अमिताभ बच्चन स्टाररच्या संभाव्य कनेक्शनचा काहीतरी संकेत देत आहे. अशा चर्चा आहेत.
Box Office : रिलीजच्या चौथ्या दिवशी दणक्यात आपटला ‘मेरी ख्रिसमस’, कतरिना कैफचा सिनेमा डब्बागुल?
सोशल मीडिया पोस्टमध्ये अभिषेक कपूर म्हणाले की, ‘मी दारू सोडल्यापासून जवळपास 4 वर्षे झाली आहेत. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि महत्त्वाचा निर्णय होता. देव जाणतो नाती नष्ट होतात आणि यातून काही संधी गमावल्या जातात. तरुणाईत असताना या गोष्टीची जाणीव झाली नाही. म्हणून परंतु जेव्हा जाणीव होते तेव्हा बदल करणे महत्त्वाचे असते. कधी कधी पुन्हा उठण्यासाठी स्वतःलाच कष्ट करावे लागतात.’
अभिषेक कपूर यांनी एक शीर्षक नसलेल्या चित्रपटाच्या शूटिंगचा टप्पा संपूर्ण केला असून सोबतीला “शराबी” ची घोषणा केली आहे आणि या दोन्ही प्रोजेक्ट्स बद्दल आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता या नव्या चित्रपटात काय बघायला मिळणार याची वाट बघायला लागणार आहे.