बातमी फेक, अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर; ईशा देओल

Esha Deol : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून मीडियामध्ये फेक बातमी चालवण्यात येत असल्याची माहिती अभिनेत्री ईशा देओलने दिली

  • Written By: Published:
Esha Deol

Esha Deol : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून मीडियामध्ये फेक बातमी चालवण्यात येत असल्याची माहिती अभिनेत्री ईशा देओलने दिली आहे. अभिनेत्री ईशा देओलने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबात माहिती दिली आहे.

अभिनेत्री ईशा देओलने सोशल मीडियावर लिहिले की, मीडिया जास्तच खोट्या बातम्या पसरवत आहे असं दिसत आहे. माझे वडीलांची तब्येत स्थिर असून ते बरे होत आहेत.  सर्वांना आमच्या कुटुंबाची गोपनीयता पाळण्याची विनंती करतो.  बाबांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद, असे ईशा देओलने इंस्टाग्रामवर लिहिले.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना 1 नोव्हेंबर रोजी रेगुलर उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मात्र मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी सकाळी धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या समोर आल्या होत्या मात्र आता अभिनेत्री आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलने धर्मेंद्र यांची पृक्रती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.

तर दुसरीकडे बॉलिवूडची जेष्ठ अभिनेत्री हेमा हेमा मालनी  यांनी देखील एक्सवर ट्विट करत धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, जे घडत आहे ते अक्षम्य आहे! जबाबदार चॅनेल्स उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि बरे होत असलेल्या व्यक्तीबद्दल खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेच्या गरजेचा योग्य आदर करा.

बिहार निवडणूक दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु ; तब्बल 1,302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

follow us