Saif Ali Khan : लिलावतीत सैफवर यशस्वी शस्त्रक्रिया; रूग्णालयाकडून महत्त्वाचं बुलेटिन आलं

Saif Ali Khan : लिलावतीत सैफवर यशस्वी शस्त्रक्रिया; रूग्णालयाकडून महत्त्वाचं बुलेटिन आलं

Actor Saif Ali Khan Health Update : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan Attack) काल (15 जानेवारी) रात्री उशिरा हल्ला झाला होता. वांद्रे येथील घरात घुसलेल्या सैफ अली खानवर चोराने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर सहा जखमा असून पाठीचा कणा आणि मानेवर गंभीर जखमा झाल्या होत्या. गंभीर अवस्थेत सैफ अली खानला लीलावती रूग्णालयात दाखल (Saif Ali Khan Health Update) केलं होतं. परंतु रूग्णालयाकडून आता महत्वाचं बुलेटिन आलंय. ज्यामध्ये लिलावतीत सैफवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्याचं स्पष्ट केलंय.

Saif Ali Khan : मुलाचं नाव तैमुर ठेवल्यानेच…; जितेंद्र आव्हाडांच्या मनात वेगळ्याचं शंका

सैफ अली खानच्या टीमकडून अधिकृत निवेदन समोर आलंय. त्यांनी निवेदनात सांगितलंय की, सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पार पडली आहे. सैफ आता धोक्यातून बाहेर आहे. सध्या सैफची प्रकृती बरी असून डॉक्टर सातत्याने लक्ष ठेवून (Bollywood News) आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत. पोलिस घटनेची चौकशी करत आहेत. डॉ. निरज उत्तमणी, डॉ. नितीन डांगे, डॉ. लीना जैन आणि लीलावती रुग्णालयातील टीमचे आभार देखील निवेदनाता मानले गेले आहेत. या काळात सर्व चाहते आणि शुभचिंतकांनी प्रार्थना केल्याबद्दल त्यांचेही आभार सैफच्या पीआर टीमकडून मानण्यात आलेत.

अभिनेता सैफ अली खानच्या मानेवर एक आणि पाठीच्या कण्याजवळ एक जखम आहे. मणक्याजवळील जखम थोडी खोल आहे. सैफच्या घरातील मोलकरीणही जखमी झाली आहे. मात्र, मोलकरणीला किरकोळ दुखापत झाली. असे सांगितले जात आहे की, त्याच्या घरात एक पाईपलाईन आहे, जी थेट बेडरूमच्या आत उघडते. प्राथमिक तपासात चोरट्याने याच मार्गाने प्रवेश केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे सैफवर मुलांच्या खोलीत धारदार वस्तूने हल्ला करण्यात आला.

सैफवर जीवघेणा हल्ला; हे लोलो…ऑल ओके? खासदार सुप्रिया सुळेंचा थेट करिश्मा कपूरला फोन

न्युरोसर्जन, कॉस्मेटिक सर्जन आणि भूलतज्ज्ञ डॉ. यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकाने सैफ अली खानचे ऑपरेशन केलेय. न्यूरो सर्जरी पूर्ण झाली आहे. सैफच्या शरीरातून धारदार वस्तू काढण्यात आलीय. ती सुमारे 2 ते 3 इंच लांब होती. आता कॉस्मेटिक सर्जरी होणार असल्याची माहिती मिळतेय. घटनेच्या वेळी करीना कपूर खान आणि तिची मुले तैमूर आणि जेह यांच्यासह संपूर्ण कुटुंब घरात होते. अभिनेता सैफ अली खानने आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी चोरांचा सामना केल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या टीमकडून अधिकृत निवेदनही समोर आलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube