…म्हणून अक्षय कुमारने OMG 2 साठी एक रूपयाही घेतला नाही

…म्हणून अक्षय कुमारने OMG 2 साठी एक रूपयाही घेतला नाही

OMG 2 Akshay Kumar : ओएमजी 2 या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमारने या चित्रपटासाठी 25 कोटी रूपये मानधन घेतल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता अक्षयच्या ओएमजी 2 च्या मानधनाबाबतीत एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ओएमजी 2 या चित्रपटासाठी अक्षय कुमारने एक रूपायाही मानधन न घेता काम केलं आहे. त्याने असं का केल? यामागचं कारण देखील सांगण्यात येत आहे.

शिंदे, राणेंसह 50 आमदार मध्य प्रदेशमध्ये; जय-पराजयाचे गणित ठरविण्यासाठी मोठी जबाबदारी

दरम्यान हा सिनेमा आता बॉक्स ऑफिसवर चांगलाचं व्यवसाय करत असल्याचे बघायला मिळत आहे. अनेक वेगळ्या आशयाचा विषय असल्याने लोकांमध्ये या सिनेमाची उत्सुकता लागल्याचे दिसत आहे.परंतु या सिनेमाला सनी पाजीच्या ‘गदर 2’ला चांगलीच टक्कर द्यावी लागत आहे. तसेच समान इतका अटीतटीचा असताना देखील या सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार केल्याचे सांगितले जात आहे.

OMG 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला चित्रपट

…म्हणून अक्षयने एक रूपयाही घेतला नाही

ओएमजी 2 या चित्रपटाचे प्रोड्युसर अजित अंधारे हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी त्यांनी ओएमजी 2 या चित्रपटासाठी अक्षय कुमारने एक रूपायाही मानधन न घेता काम केलं आहे. त्याने असं का केल? यामागचं कारण देखील सांगितलं आहे. ते म्हणाले की, ओएमजी 2 या चित्रपटासाठी अक्षय कुमारने एक रूपायाही मानधन न घेता काम केलं आहे. त्याच बरोबर त्याने निर्मात्यांना अर्थिक मदत देखील केली आहे. आमचे आणि अक्षयचे अनेक वर्षांपासून संबंध आहेत. तो आमच्यासोबत ओएमजी, स्पेशल 26, आणि टॉयलेट : एक प्रेम कथा, या चित्रपटांपासून काम करतो. त्यामुळे या चित्रपटात त्याने कामही केले आणि आर्थिक मदतही केली. असं त्यांनी सांगितलं.

तसेच ‘ओएमजी-2’ हा सिनेमा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या खिलाडीच्या ‘ओएमजी’ या सिनेमाचा सिक्वेल आहे. ओएमजी या सिनेमाला देखील चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती. परंतु आता ओएमजी-2 या सिनेमाने देखील अनेक जण सोशल मीडियावर कौतुक करत असल्याचे बघायला मिळत आहे. गेला काही दिवसापासून या सिनेमाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या टीझर आणि ट्रेलरला देखील चाहत्यांची मोठी पसंती मिळाल्याचं बघितलं होत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube