Alyad Palyad मध्ये नृत्य अन् दिलखेचक अदांनी माधुरी जिंकणार प्रेक्षकांची मनं
Alyad Palyad marathi film Madhuri Pawar impress by Dance : मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवारचा ( Madhuri Pawar ) मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या अभिनय नृत्यांतून प्रेक्षकांची मने जिंकणारी माधुरी आता ‘अल्याड पल्याड’ ( Alyad Palyad ) चित्रपटातही आपल्या नृत्याचा जलवा दाखवणार आहे. आपल्या मोहक अदांनी घायाळ करणाऱ्या माधुरीवर एक धमाकेदार आयटम नंबर चित्रीत झालं आहे.
नगर दक्षिणमध्ये 5.13 तर शिर्डीत 6.83 टक्के मतदान, उमेदवारांनीही बजावला मतदानाचा हक्क
‘दणक्यात साजरा करूया जागर नाच गड्या वाकडा तिकडा रांगडा तू नाच’ असे बोल असलेले हे धमाकेदार गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंड झालं आहे. हे धमाकेदार गाणं शार्दूल यांनी लिहिलं असून ऋचा कुलकर्णी आणि शार्दूल यांच्या दमदार आवाजात ते स्वरबद्ध करण्यात आलं आहे. वी.आर. ऋग्वेद याचं संगीत या गाण्याला लाभलं आहे. एस.एम.पी प्रोडक्शन् अंतर्गत ‘अल्याड पल्याड’ चित्रपट १४ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे.
Lok Sabha Election च्या चौथ्या टप्प्यात दिग्गजांची कसोटी; उमेदवारांसह नेत्यांनी बजावला मताधिकार
हे आयटम सॉंग करताना मला खूप मजा आली. प्रेक्षकांनाही हे आयटम सॉंग ठेका धरायला लावेल असा विश्वास माधुरीने व्यक्त केला. दुर्गम भागातल्या एका गावाची, तिथल्या माणसांची रहस्यमय कथा असलेला ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, मकरंद देशपांडे, सुरेश विश्वकर्मा, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात आहेत.
कथा प्रीतम एस के पाटील यांची असून पटकथा संवाद संजय नवगिरे यांचे आहेत.रंगभूषा अभिषेक पवार यांची आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांचे आहे. प्रोडक्शन मॅनेजरची जबाबदारी स्वानंद देव व विष्णू घोरपडे यांनी सांभाळली आहे.