अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव जाहीर

अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव जाहीर

Ashok Saraf Rohini Hattangadi: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईच्या वतीने दरवर्षी 14 जून रोजी गो.ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आला आहे. (Akhil Bharatiy Marathi Natya Parishad) यंदाच्या वर्षी जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला, याविषयीची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी दिली.

मागील तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. नाट्य परिषदेची निवडणूक पार पडताच, कमी वेळात तातडीने नवनिर्वाचित नियामक मंडळाने जीवनगौरव पुरस्कार देण्याचे योजिले व पुरस्कार देण्यात आला आहे.

यंदाच्या वर्षी 14 जून 2024 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टॅक रोड, मांटुगा -माहीम, मुंबई येथे सायंकाळी 4 वाजता सर्व पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली आहे.

वैजूचं स्वप्नातील राजकुमारासोबत लग्न होईल का? ‘माटी से बंधी डोर’ मध्ये मराठमोळी ऋतुजा दिसणार

नाट्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या नाट्यकर्मींचा सन्मान नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी केला जातो. यानिमित्ताने कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 100व्या नाट्यसंमेलनानिमित्त घेण्यात आलेला ‘नाट्यकलेचा जागर’ यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन कार्यक्रम यानिमित्ताने सादर होणार आहेत. कलावंत व नाट्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन प्रशांत दामले यांनी यावेळी केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज