वैजूचं स्वप्नातील राजकुमारासोबत लग्न होईल का? ‘माटी से बंधी डोर’ मध्ये मराठमोळी ऋतुजा दिसणार

वैजूचं स्वप्नातील राजकुमारासोबत लग्न होईल का? ‘माटी से बंधी डोर’ मध्ये मराठमोळी ऋतुजा दिसणार

New Serial Rutuja Bagave in lead role : प्रेक्षकांचे निखळ मनोरंजनाची परंपरा कायम ठेवत, पुन्हा एक अनोखी अशी मालिका प्रेक्षकांसमोर येण्याकरिता सज्ज झाले आहेत. या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे व अंकित गुप्ता मुख्य भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. ‘माटी से बंधी डोर’ असे या मालिकेचे शिर्षक असून या मालिकेत ऋतुजा वैजयंती (वैजू)ची व्यक्तीरेखा साकारत आहे, तर अंकित गुप्ता रणविजयच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

IIT च्या 7 हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच नाही; संस्थेने मागितली माजी विद्यार्थ्यांची मदत

‘माटी से बंधी डोर’ ही मालिका वैजू या व्यक्तीरेखेची कथा आहे जी शेतात काम करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावत असते. प्रत्यक्षात तिच्या नशीबात काही औरच लिहिलेले असते. वैजूची नाळ जितकी आपल्या कुटुंबासोबत जोडलेली आहे तितकेच घट्ट नाते तिचे आपल्या गावाशीही आहे. त्यामुळे प्रचंड मेहनत करुन या गावाचा कायापालट करायचा हे वैजूचे एकमेव लक्ष्य आहे.

छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई : नारायणपूरच्या जंगलात सात नक्षलवादी ठार

नुकतेच मेकर्सनी या शोचा एक जबरदस्त प्रोमो रिलीज केला. यामध्ये प्रेक्षक वैजूला आपल्या स्वप्नातील राजकुमार रणविजयच्या भेटीसाठी प्रतिक्षा करताना पाहू शकतील. प्रेक्षकांना वैजू व रणविजय यांच्यात एक ड्रीम सिक्वेन्सही पहायला मिळेल, ज्यात वैजू रणविजयसोबत रोमँटिक क्षण घालविण्याचे स्वप्न पाहतेय. आपल्या अनोख्या अंदाजात ती रणविजयसोबत आपल्या भावी आयुष्याविषयी बोलते.

मोठी बातमी! पुणे पोर्श अपघात प्रकरणी पोलिसांचीही चौकशी होणार, आयुक्तांनी दिले आदेश

रणविजयला मात्र तिचे हावभाव विचित्र वाटतात व तो तिला सांगतो की त्याला एका अशा मुलीची लग्न करायचे आहे जी शिकलेली असेल न की एखादी पैलवान. हे ऐकून वैजूचा ह्रदयभंग होतो. वैजू मात्र कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता आपल्या भावना मोकळेपणाने व ईमानदारीने व्यक्त करते. आता वैजूसाठी पुढे काय लिहिले असेल? तिचे आपल्या स्वप्नातील या राजकुमारासोबत लग्न होईल का? आणि रणविजय तिचा प्रस्ताव स्वीकारेल का? हे पाहणे खूपच मनोरंजक ठरेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज