BB Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील खट्याळ सासू अन् नाठाळ सून पाहिलीत का? गोलीगत सूरज बनलाय भावजी
Bigg Boss Marathi New Season Day 32 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील (Bigg Boss Marathi New Season) काही सदस्यांमध्ये वाद होत आहेत. (Bigg Boss Marathi) तर काही सदस्यांमध्ये मात्र चांगलीच मैत्री पाहायला मिळत आहे. (BB Marathi) सदस्य आता जोडीत अडकले गेले आहेत. जोड्यांच्या बेड्यांनी काहींच्या मैत्रीत मेळ जमवला आहे. (Bigg Boss Marathi New Promo) या जोड्यांच्या बेडीत आज एक जोडी मात्र चांगलीच गाजणार आहे. तर दुसरीकडे ही बेडी कोणाचा गेम करणार याकडेही सर्वांचच लक्ष लागलं आहे.
View this post on Instagram
‘बिग बॉस मराठी’च्या घरात कालच्या भागात खट्याळ सासू आणि नाठाळ सुनेचा धमाल किचन ड्रामा पाहायला मिळाला. तर गोलीगत सूरज भावजी मात्र दुरून मजा घेताना दिसून आले. समोर आलेल्या प्रोमोमध्ये, सूरज वर्षाताईंना म्हणतोय,”आई या वहिनींना सांग जरा”. त्यावर अंकिता म्हणते,”भावजी लावलं की नाही सासूबाईंना कामाला”. त्यावर वर्षा ताई म्हणतात,”आता मी सूनबाईंना कामाला लावणार आहे”. अंकिता म्हणते,”मी कामं करणारच नाही..माझी मर्जी”. पॅडी म्हणतो,”भावजी भावजी मिठाचा खोका… भावजींच्या मिशीवर बसला बोका”.
किचनमधल्या कामावरून खट्याळ सासू आणि नाठाळ सुनेची चांगलीच धमाल सुरू आहे. अंकिता आणि वर्षा ताईंचे ‘तू तू मैं मैं’ पाहणं प्रेक्षकांसाठी मात्र मनोरंजक ठरत आहे.
घरात नवीन समीकरण तयार होणार?
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये सूरज आणि आर्या निक्की, अरबाज, अभिजीत यांच्यातील नात्यांवर एक खास गाणं म्हणताना दिसून येत आहेत. त्यावर घरातील इतर सदस्यही मजा घेताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज चांगलाच माहोल बनणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मात्र मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळणार आहे. निक्कीने टीम A ला रामराम केल्यानंतर तिला आता अभिजीतचा मोठा पाठिंबा मिळत आहे. आता किती दिवस निक्की आणि अभिजीतची जोडी एकत्र दिसेल याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. पण त्यांची दिल दोस्ती दुनियादारी मात्र लक्ष वेधून घेत आहे.
Bigg Boss Marathi: ‘कोणी प्रेमाला ठोकर मारणार तर कोणी पस्तावणार’, घरात नवीन समीकरण तयार होणार?
सूरजला पाहून पॅडी दादांनी केली कविता
नुकत्याच आलेल्या बिग बॉसच्या नव्या प्रोमोत तुम्ही पाहू शकता की, सूरज अंकितला पाहून वर्षा ताईंना म्हणातो की, आई या वाहिनीला सांग जरा.. त्यावर अंकिता म्हणते की,” ओ भाऊजी ड्युटी सांभाळ तुमची. लावले की नाही सासू बाईंना कामाला.” त्यावर वर्षां ताई म्हणाल्या,” आता मी लावणार आहे सून बाईंना कामाला. त्यावर अंकीता म्हणते की, “मी काम करणारच नाही माझी मर्जी, माझे काम.” यावर सूरज म्हणतो की, सासूचे ऐकावे लागते. त्याचा तो हक्क आहे. यावर वर्षा ताई म्हणतात की,” मला कोणी काम कर असे सांगायला लागत नाही. मी माझी काम प्रेमाने करते. या सगळ्यां मस्करीवर पॅडी दादा म्हणतात,” भाऊजी भाऊजी मिठाचा खोका, भाऊजिंच्या मिशिवर बसला बोका.