‘गुलिगत’ फेम सूरज चव्हाण झाला बिग बॉस मराठीचा नवा कॅप्टन! ‘झापुक झुपुक’ने सर्वांनाच लावलं वेड

‘गुलिगत’ फेम सूरज चव्हाण झाला बिग बॉस मराठीचा नवा कॅप्टन! ‘झापुक झुपुक’ने सर्वांनाच लावलं वेड

Bigg Boss Marathi New Season Day 41: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या (Bigg Boss Marathi New Season) एपिसोडमध्ये ‘गुलिगत’ फेम सूरज चव्हाणचा (Suraj Chavan) एक वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे. (Bigg Boss Marathi ) आतापर्यंत त्याला खेळ समजत नव्हता, (Bigg Boss Marathi New Promo) ‘नॉमिनेशन’ (Nomination) या शब्दाचा उच्चारही करता येत नव्हता, तोच सूरज एपिसोडमध्ये आज बिग बॉसच्या घरातील नव्या कॅप्टन बनला आहे. आजच्या भागाचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)


बिग बॉसचा नवा कॅप्टन

बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमो आऊट झाला आहे. यामध्ये कॅप्टन्सी कार्याची एक खास झलक बघायला मिळाली आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन कॅप्टन होण्याचा मान सूरज चव्हाणला मिळाला आहे. कॅप्टन्सी कार्यात सूरज चव्हाणने झापुक झुपूक गेम करत बाजी मारली आणि तो आता बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन कॅप्टन झाल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर घरातील सदस्यांनी त्याचं अभिनंदन करत तोंडभरून कौतुक केल्याचं पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये त्याच्या झापुक झुपुकने सगळ्यांचं काळीज जिंकलय, घरातील सर्व सदस्य एकमुखाने आमचा कॅप्टन म्हणजे सूरज! म्हणतायेत.

निक्की अन् अभिजीतचा वाद कशावरुन पेटलाय?

बिग बॉस मराठी’च्या घरात काही दिवसांपासून निक्की आणि अभिजीतची मैत्री दिसून येत आहे. पण आजच्या भागात मात्र त्यांच्यात वाद झालेला दिसून येणार आहे. अभिजीतला निक्की म्हणतेय,”मी काय शब्द वापरायचे, काय मुद्दे मांडायचे हे तू मला सांगू नकोस. मी पहिल्या दिवसापासून मुद्दे मांडते हे तुलाही माहिती आहे”. यावर अभिजीत म्हणतो,”कारण तू मला आधी म्हणाली होतीस की शब्द जपून वापर. तुला कळत नाही का?”. यावर उत्तर देत निक्की म्हणते,”तू चुकीचा अर्थ काढला आहेस”. तर अभिजीत म्हणतो,”ज्या गोष्टींवर तू बोलतेस त्यावरच मी बोललोय. तुझ्यासाठी मी एकही वेगळा शब्द वापरलेला नाही”.

वाद घातल्यानंतर निक्की आणि अभिजीत एकमेकांसोबत संवाद साधतानादेखील दिसून येणार आहेत. अभिजीतने निक्कीला जेवणाबद्दल न विचारल्याने ती नाराज आहे. निक्की अभिजीतला म्हणतेय,”तू मला जेवणाबद्दल विचारलं नाही म्हणून माझी सटकली होती. दाखवण्यापुरतं तू माझ्याकडे एक चपाती घेऊन आला असतास तरी मला आवडलं असतं”. निक्कीला प्रतिउत्तर देत अभिजीत म्हणतो,”मी आलो असतो तर मला बाकी सदस्य खूप बोलले असते”. निक्की म्हणते,”मैत्रीत थोडे फार वाद होतच असतात. तू इतरांचा विचार का करतोस?”.

Bigg Boss Marathi : डिपी दादांची नाराजी; बदलणार टीम B च्या खेळाचे इक्वेशन?

निक्की घरातील सर्व सदस्यांसाठी बनवतेय चहा

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात ड्युटी करण्यास नकार देणारी निक्की चहा बनवताना दिसत आहे. त्यामुळे घरातील इतर सदस्यांना मात्र आनंदाची उकळी फुटली आहे. अंकिता म्हणतेय,”चहाचा खीरसारखा सुगंध सुटलाय”. चहा बनवण्यासोबत इतर कामं करण्यासाठीदेखील निक्की पुढाकार घेताना दिसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube