‘नानां’च्या ‘वनवास’ला थंड प्रतिसाद; पहिल्याच दिवशी फक्त ‘इतकी’ कमाई

‘नानां’च्या ‘वनवास’ला थंड प्रतिसाद; पहिल्याच दिवशी फक्त ‘इतकी’ कमाई

Vanvaas Box Office Collection Day one : अनिल शर्मा दिग्दर्शित आणि नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर अभिनित ‘वनवास’ हिंदी चित्रपट (Vanvaas Box Office Collection) शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमला वाटत होता. परंतु, तसं घडताना दिसलं नाही. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा अतिशय थंड प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी वनवास चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर किती कमाई केली याची माहिती जाणून घेऊ या..

वनवास रिलीज झाला त्याच दिवशी याच चित्रपटाचा सामना ‘मुफासा : द लायन किंग’ या चित्रपटाशी होता. तर दुसरीकडे अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा देखील धुमाकूळ घालत होता. यामुळे नाना पाटेकर (Nana Patekar) आणि उत्कर्ष शर्माच्या वनवासाचा पहिला दिवस निराशाजनक राहिला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली याची माहिती समोर आली आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार वनवासने पहिल्या दिवशी फक्त 60 लाख रुपयांची कमाई केली. खरंतर हे अगदी सुरुवातीचे आकडे आहेत. आज शनिवार आहे उद्या रविवार आहे. विकेंडच्या या दोन दिवसांत चित्रपटगृहांत गर्दी होईल आणि कमाई वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

‘वनवास’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित! नाना पाटेकर अन् उत्कर्षच्या भूमिकेनं वेधलं चाहत्यांचं लक्ष

वनवासची ओपनिंग निराशाजनक राहिली. पहिल्या दिवशी चित्रपटाला एक कोटींचा टप्पा पार करता आला नाही. पहिल्याच दिवशी अशी अवस्था आहे तर पुढील दिवसांत काय होणार अशी चिंता स्पष्ट दिसू लागली आहे. तसंही पुष्पा 2 समोर वनवास टिकणं कठीणच आहे. वरुण धवनचा बेब जॉन चित्रपटही लवकरच रिलीज होणार असल्याने स्पर्धा आणखी वाढणार आहे. या स्पर्धेत वनवास आणखी किती कमाई करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

वनवासमध्ये बॉलिवूडमधील आघाडीचे अभिनेते नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरन कौर प्रमुख भूमिकेत आहेत. खुशबू सुंदर, राजपाल यादव, अश्विनी कळसेकर, परितोष त्रिपाठी, मनीष वधवा आणि राजेश शर्मा सहायक भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन गदर चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केलं आहे. तसेच सुमन शर्मा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

अनिल शर्मा यांचे उत्कंठा वाढविणारे कथन आणि दिग्गज कलावंत यामुळे ‘वनवास’मधून पारंपरिक नाट्याच्या पलीकडे पोहोचतं, कालातीत संकल्पनेतून खोल भावनिक प्रवास सादर होतो. अनिल शर्मा लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित हा चित्रपट झी स्टुडिओज अंतर्गत जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना अशा कथा बघण्याचे आमंत्रण देतो, ज्यातील प्रत्येक कांगोऱ्याचे प्रतिध्वनि पिढ्यानपिढ्या उमटत राहतील. ही अजिबात चुकवू नये, अशी एक कौटुंबिक गाथा असल्याचे सांगण्यात आले.

ठरलं! ‘या’ तारखेला‘वनवास’चित्रपट दिसणार सिनेमागृहात; नाना पाटेकर अन् उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत   

follow us
  • fb
  • instagram
  • youtube