Jagun Ghe Jara Movie : ‘जगून घे जरा’ चित्रपट लवकरच; लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन चित्रपटाची घोषणा

Jagun Ghe Jara Movie : ‘जगून घे जरा’ चित्रपट लवकरच; लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन चित्रपटाची घोषणा

Jagun Ghe Jara Movie : लालबागच्या राजाचं दर्शन घेत स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शित “जगून घे जरा” चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या कथेवर आधारित जगून घे जरा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी दिली आहे.

Boys 4 Title Song : अभिनयानंतर धैर्या, ढुंग्या अन् कबीरचं गायन क्षेत्रातही पाऊल; ‘बॉईज ४’चं टायटल सॉन्ग प्रदर्शित…

या चिपटाचं लेखन शिरीष लाटकर यांनी केलं असून चित्रपटामध्ये राकेश बापट, सिद्धी म्हांबरे असे कलाकार पडद्यावर झळकणार आहेत. तर चित्रपटामध्ये राकेश आणि सिद्धी यांची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांनी अनुभवायला मिळणार आहे.

Weather Update : बाप्पाच्या निरोपालाही पाऊसधारा! आज ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार

‘जगून घे जरा’ चित्रपटातील गाण्यांना निलेश मोहरी आणि अमित राय यांचे संगीत लाभले असून नुकतेच गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी ‘जगून घे जरा’ चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी बाप्पाचा आशीर्वाद घेत चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

Sonu Nigam कडून बिटर बिट्रेयल्सची घोषणा ‘अच्छा सिला दिया’ च्या आठवणींना उजाळा

सिद्धी म्हांबरेच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन चेहरा मिळाला असून आज गणेशोत्सवानिमित्त ‘जगून घे जरा’ या चित्रपटाची घोषणा आम्ही केली, चित्रपटात राकेश आणि सिद्धी यांची फ्रेश जोडी दिसणार असून चित्रपटाची कथा रोमँटिक, प्रेरणादायी व मनाला स्पर्श करणारी आहे. ‘जगून घे जरा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारेंनी सांगितलं आहे.

मोठी बातमी : माजी खासदार विजय दर्डांसह पुत्राला दिलासा; कोळसा घोटाळा प्रकरणातील शिक्षेला स्थगिती

तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाचा आशीर्वाद घ्यायला सगळे जमतात. आज लालबागच्या राजाच्या चरणी आम्ही ‘जगून घे जरा’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले, याचं मनाला समाधान वाटतं. ‘जगून घे जरा’ ही एक अनोखी संवेदनशील अशी प्रेमकथा आहे. जसे सर्वांचे बाप्पासोबत भावनिक नाते आहे तसाच हा चित्रपट देखील भावनांवर व नात्यांवर भाष्य करणार असल्याचं प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले आहेत.

दरम्यान, 88 फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी, हार्दिक गज्जर फिल्म्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी क्षितिजा खंडागळे यांनी सांभाळली आहे, तर ऋषिकेश गांधी यांचे छायाचित्रण चित्रपटाला लाभणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube