Vedaa Teaser: ‘झगड़ना नहीं आता मुझे, सिर्फ…’, जॉन अब्राहमच्या ‘वेद’चा धमाकेदार टीझर रिलीज

Vedaa Teaser: ‘झगड़ना नहीं आता मुझे, सिर्फ…’, जॉन अब्राहमच्या ‘वेद’चा धमाकेदार टीझर रिलीज

Vedaa Teaser Released Out: जॉन अब्राहम (John Abraham) आणि शर्वरी वाघ (Sharwari Wagh) यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘वेद’चा (Vedaa Movie) दमदार टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ फुल ऑन ॲक्शन अवतारात दिसत आहेत. टीझरमध्ये शर्वरी वाघ व्यवस्थेविरोधात आवाज उठवताना दिसत आहे. जॉन अब्राहम त्याच्या संरक्षकाच्या भूमिकेत त्याच्यासोबत युद्ध करताना दिसणार आहे. दोन्ही स्टार्सचा सामना खलनायक अभिषेक बॅनर्जीशी (Abhishek Banerjee) होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)


‘वेद’ च्या टीझरची सुरुवात शर्वरी वाघच्या ॲक्शन लोडेड अवताराने होते. जी आपल्या हक्कासाठी लढताना दिसत आहे. यानंतर जॉन अब्राहमची हटके अंदाजात एंट्री होते, आणि म्हणतो की, मला कसे लढायचे ते माहित नाही, मला फक्त लढायचे हे माहित आहे. यानंतर जेव्हा त्याच्या शत्रूंनी त्याची ओळख विचारली तेव्हा त्याने स्वतःला सर्वांचा बाप असे म्हटले. ‘वेद’च्या टीझरमध्ये तमन्ना भाटियाची (Tamannaah Bhatia) झलकही पाहायला मिळते. या चित्रपटात तमन्ना आणि जॉनची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

‘वेद’ 12 जुलैला होणार प्रदर्शित

झी स्टुडिओ निर्मित ‘वेद’ या ॲक्शनपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणीने (Nikhil Advani) केले आहे. जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय अभिषेक बॅनर्जी आणि तमन्ना भाटिया देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. ‘वेद’ यावर्षी 12 जुलैला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Dabangg 4: चुलबुल पांडेच्या भूमिकेत भाईजान पुन्हा दिसणार, अरबाज खानने ‘दबंग 4’ बद्दल दिली हिंट

दीड वर्षांनी पडद्यावर पुनरागमन

जॉन अब्राहम हा तब्बल दीड वर्षांनी ‘वेद’च्या माध्यमातून पडद्यावर परतणार आहे. हा अभिनेता अखेरचा शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ या चित्रपटात दिसला होता. जॉन या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता आणि हा चित्रपट पडद्यावर हिट ठरला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube