Kon Honar Crorepati’च्या मंचावर प्रशांत दामले अन् कविता लाड लावणार हजेरी !

Kon Honar Crorepati’च्या मंचावर प्रशांत दामले अन् कविता लाड लावणार हजेरी !

Kon Honar Crorepati : ‘कोण होणार ‘करोडपती’ (Kon Honar Crorepati) या कार्यक्रम अल्पावधीत काळात लोकप्रियतेच्या शिखरावर येऊन पोहोचला आहे. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवार म्हणजेच आजच्या ‘विशेष भागामध्ये’ मराठी रंगभूमीचा हाऊसफूल सम्राट प्रशांत दामले (Prashant Damle) आणि अभिनेत्री कविता लाड (Kavita Lad) हे हॉट सीटवर बसणार आहेत. प्रशांत दामले आणि कविता लाड ‘कोण होणार करोडपती’चा खेळ अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेसाठी खेळले आहेत. ते स्वतः अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)


मराठी नाटकांच्या भविष्यासाठी ते ‘कोण होणार करोडपती’चा खेळ रंगवणार आहेत. या पर्वात हा विशेष भाग असणार आहे. या भागामध्ये प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्याशी गंमतीशीर गप्पा रंगणार असल्याचे सांगितले जात आहे. या विशेष भागाची सुरुवात प्रशांत दामले त्यांच्या ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ या गाण्याने होणार असल्याची चर्चा आहे. यामुळे या मंचावर एकदम हास्याचे वातावरण तयार होणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रशांत दामले आणि कविता लाड हे ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर त्यांच्या आयुष्याबद्दल व्यक्त झाले आहेत.

प्रशांत दामले काही ठरावीक नाट्यगृहांत प्रयोग का करत नाहीत, यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. प्रशांत दामले यांनी मोरूची मावशी नाटकाच्या दरम्यानचा ‘तो’ रंजक किस्सा देखील सांगितला आहे. सुरुवातीला १६१ प्रयोग होईपर्यंत हे नाटक रंगभूमीवर गाजले नव्हते. परंतु नंतर दूरदर्शनवरील एका कार्यक्रमाच्या दरम्यान प्रशांत दामले यांनी त्यातील गाणे सादर केले. ते गाणे चाहत्यांना इतके आवडले होते की, त्या गाण्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.

त्यापुढील आजपर्यंतचे सगळे प्रयोग हे हाऊसफूल गेले आहेत, अशी आठवण प्रशांत दामले यांनी सांगितली आहे. कविता लाड यांनी प्रशांत दामले यांच्या कामाचे खूपच कौतुक केले आहे. त्यांच्यासारखा हिरो रंगभूमीवर कायम काम करत आहे. त्यामुळे सगळ्यांना कामाचा हुरूप येत असतो. प्रशांत दामले आणि कविता लाड यांनी भरपूर वर्षे सोबत काम केले आहे. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या अनेक आठवणी या मंचावर उलगडणार असल्याचे सांगितले जात आहे. अनेक नाटकाच्या दरम्यान झालेले किस्से आणि आठवणी चाहत्यांना ऐकायला मिळणार आहेत, आणि ते किस्से आणि त्या आठवणी चाहत्यांना नक्कीच आवडणार असल्याचे सांगितले जात आहे.

Ketaki Chitale: केतकीच्या ‘तुरुंगातील प्रवासावर’ प्रकाशित होणार पुस्तक? नेमकं काय घडलं होतं…

मराठी रंगभूमीवरील हाऊसफूल सम्राट प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या सहभाग असलेला ‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग १ जुलै दिवशी म्हणजेच आज रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर बघायला मिळणार आहे. जिंकलेली रक्कम ते अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेला  देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. आता अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेसाठी खेळत असताना ‘कोण होणार करोडपाती’च्या खेळात ते किती रक्कत जिंकणार आहे, हे बघणं खूपच उत्सुकतेचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube