Manushi Chhillar: मानुषी छिल्लरचा ‘ऑपरेशन व्हॅलेंटाइन’ मधील लूक प्रेक्षकांच्या भेटीला !
Manushi Chhillar: अभिनेत्री युथ आयकॉन मानुषी छिल्लरने (Manushi Chhillar) मुंबईतील मिठीबाई कॉलेजच्या फेस्टिवलमध्ये आपल्या आगामी चित्रपटातील लूक लाँच केला आणि ती या फेस्टिवलमध्ये चर्चेचा विषय ठरली. मानुषी चिल्लरने आगामी चित्रपट “ऑपरेशन व्हॅलेंटाईनमधील (Operation Valentine) तिचा लूक या ठिकाणी लाँच करून प्रेक्षकांचं प्रेम मिळवल.
View this post on Instagram
मानुषी चिल्लर द्विभाषिक (तेलुगु आणि हिंदीमध्ये चित्रित) मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री पैकी एक ठरली असून आगामी चित्रपटात ती रडार अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय हवाई दलातील नायकांचा प्रवास दाखवून देत आहे. शक्ती प्रताप सिंग दिग्दर्शित ऑपरेशन व्हॅलेंटाइन तेलेगु स्टार्स वरुण तेज दिसणार आहे. या चित्रपटातील कलाकार आणि क्रू प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वाघा बॉर्डरवर “वंदे मातरम ” हे गाणे लाँच करणार असून 16 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी मानुषी अभिनेत्री असण्यासोबत एक उत्तम मॉडेलदेखील आहे. तिने 2017 साली ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला होता. त्यापूर्वी 2000 साली बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने या किताबावर नाव कोरलं होतं. मानुषी तिच्या ग्सॅमरस लूकने चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. सोशल मीडियावर ती कायम अॅक्टिव्ह असते. मानुषीचे अनेक प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहेत.