Maratha Reservation चे रिअल हिरो ‘जरांगे’ पाटील झळकणार पडद्यावर; लवकरच येणार चित्रपट
Maratha Reservation : मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर आता सरकारकडून त्यांच्या आंदोलनवरआणि मराठा आरक्षणासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. त्यात आता मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेले आणि पहिल्यापासून त्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या या नायकाच्या आयुष्यावर आता सिनेमा देखील येणार आहे. त्यासाठी चित्रपट निर्माात्यांनी थेट जालना गाठलं आहे.
Maratha Reservation : आंदोलनाचे यश नजरेच्या टप्प्यात; आत्महत्येसारखं पाऊल उचलू नये
‘जरांगे’ पाटील झळकणार पडद्यावर…
जरांगे यांचं उपोषण आता राज्यच नाही तर देशात पोहचलं आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर थेट चित्रपट येत आहे. त्यासाठी त्यांच्यावर चित्रपट बनवणारे निर्माते आणि लेखक गोवर्धन गोवताडे यांनी जालन्यातील त्यांच्या आंतरवाली सराटी या गावात त्यांच्या उपोषण स्थळी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की, जरांगे यांचा संघर्ष अनेक वर्षांचा आहे. तो येणाऱ्या पिढीला कळावा यासाठी आम्ही हा चित्रपट बनवत आहोत.
Video : अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनाही धोनीची मोहिनी, स्वतः आमंत्रण देत लुटला गोल्फचा आनंद
त्याच्या या संघर्षाची राज्य आणि केंद्र सरकारने देखील दखल घेतली पण चित्रपटसृष्टीतील कोणी या ठिकाणी आलेले नाही. त्यामुळे एका मराठी माणसाचा लढा लोकांसमोर आणण्यासाठी त्यासाठी हा चित्रपट आम्ही करणार आहोत. तर हा चित्रपट पिपली लाईव्ह या हिंदी चित्रपटाप्रमाणे विनोदी नसणार आहे. हा चित्रपट वास्तविक घटनेवर आधारित असणार आहे.
https://youtu.be/PsFTp2Q_JOo?si=6gc5_QDHfxnLt5Q0
रोहन पाटील हा जरांगे यांची भूमिका साकारणार आहे. त्याने सांगितले की, ‘संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. तसेच मला जरांगे यांची भूमिका करायला मिळत असल्याचा आनंद झाला आहे. तर लवकरच या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार असल्याची माहिती यावेळी या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने दिली.