बाईक चालवताना फोनवर बोलतोय? शिव्या नगो.. शॅल्युट मारा..100 तोफांची सलामी द्या; मराठी अभिनेता संतापला

बाईक चालवताना फोनवर बोलतोय? शिव्या नगो.. शॅल्युट मारा..100 तोफांची सलामी द्या; मराठी अभिनेता संतापला

Marathi Actor Swapnil Rajshekhar Slams Bike Riders : अभिनेता स्वप्नील राजशेखर (Swapnil Rajshekhar) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ते सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर भाष्य करताना दिसतंच. असंच काही महिन्यांपूर्वी त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत पोस्ट शेअर करत स्पष्ट मत मांडलं होतं. परंतु अभिनेता स्वप्नील राजशेखर (Bike Riders) यांनी नुकत्याच एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये (Viral Video) फोनवर गप्पा मारत बाईक चालवणाऱ्या रायडर्सची कोल्हापुरी स्टाईलने त्यांनी शाळा घेतल्याचं दिसतंय.

गेली दोन वर्षे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत (Entertainment News) आहे. या मालिकेतील सगळेच कलाकार आता घराघरांत पोहोचले आहेत. आपल्या अभिनयाची छाप उमटवत लोकप्रिय देखील झाले आहेत. यामध्ये अधिपतीच्या वडिलांची म्हणजेच चारुहास भूमिका अभिनेते स्वप्नील राजशेखर साकारत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swapnil Raajshekhar (@swapnil.rajshekhar)

भुजबळ मंत्री झाले, शुभेच्छा देताना ठाकरेंचे शिलेदार दुभंगले; राऊतांची टीका, नार्वेकरांकडून अभिनंदन

व्हिडिओमध्ये स्वप्नील राजशेखर म्हणत आहे की, बाईक चालवत असताना कानाला फोन लावून गप्पा मारणारी माणसं साधीसुधी नाहीत. तुम्ही या माणसांना अजिबात सामान्य समजू नका. ही माणसं खूप महत्वाची आहेत. मला वाटतं, त्यांच्यावर भरपूर काम सोपवलेलं आहे. आपल्या देशाची सुरक्षा यांच्याच हातात आहे, असा माझा अंदाज आहे. कदाचित सुरक्षेसंदर्भातील सगळी माहिती यांच्याकडे असते, म्हणून त्यांना एवढे फोन येत असावेत, असा टोला देखील राजशेखर यांनी लगावली आहे.

‘टीबी’चा विळखा करा सैल! आरोग्य मंत्रालयाने सांगितली 10 लक्षणे; वाचा अन् उपाय अमलात आणाच..

रस्त्याच्या कडेला उभं राहून फोनवर बोलावं, एवढाही वेळ या लोकांकडे नसतो. त्यामुळेच हे लोकं स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून धावत्या गाडीवर फोनवर बोलत जातात. ही एवढी मोठी रिस्क फक्त आपल्यासाठीच घेतात, असा माझा अंदाज आहे. त्यामुळे अशी एका हातात फोन घेऊन गाडी चालवणारी माणसं दिसली तर त्यांच्यावर अजिबात चिडू नका.वाद घालू नका, शिव्याही नको, त्यांना सॅल्यूट मारा…100 तोफांची सलामी द्या! ही सगळी माणसं महत्त्वाची असल्याचं उपरोधिक वक्तव्य स्वप्नील राजशेखर यांनी केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube