रहस्यमय ट्रेलरनंतर “छबी” चित्रपटातलं प्रत्येकाला ताल धरायला लावणारं गाणं लाँच!
Marathi Film Chhabi च्या ट्रेलरनं उत्सुकता निर्माण केली आहे. तर आता सर्वांना ताल धरायला लावणारं "होय महाराजा" गाणं प्रदर्शित झालं आहे.

Marathi Film Chhabi hoy maharaja Song Release : कोकणाच्या पार्श्वभूमीवरील एक गूढरम्य कथा असलेल्या छबी या चित्रपटाच्या ट्रेलरनं चित्रपटसृष्टीसह प्रेक्षकांमध्येही उत्सुकता निर्माण केली आहे. त्याबरोबरच आता सर्वांना ताल धरायला लावणारं “होय महाराजा” हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. आर्या आंबेकर, रोहित प्रधान यांनी गायलेलं हे गाणं रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलं आहे. “छबी” हा चित्रपट 25 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का! सीबीएसईने बदलले परीक्षा नियम, मोठी अडचण…
केके फिल्म्स क्रिएशन, उप्स डिजिटल एंटरटेन्मेंट यांनी “छबी” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जया तलक्षी छेडा निर्माता आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत मसूरकर यांचं आहे. चित्रपटात ध्रुव छेडा, सृष्टी बाहेकर, अनघा अतुल, रोहित लाड, ज्ञानेश दाभाणे या नव्या दमाच्या कलाकारांसह समीर धर्माधिकारी, मकरंद देशपांडे, शुभांगी गोखले, राजन भिसे, संजय कुलकर्णी, लीना पंडित असे अनुभवी कलाकार आहेत.
https://youtu.be/5XkNz8A1_Bs?si=kYWDkt-Nsl9MMSeH
मोदींच्या वाढदिवसाचं कव्हरेज थांबवण्यासाठी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना; भाजपचा आरोप
“होय महाराजा” हे गाणं चित्रपटातील विवाहप्रसंगी होणाऱ्या हळदीच्या कार्यक्रमाचं आहे. सहजसोपे शब्द, ताल धरायला लावणारं संगीत, उत्तम नृत्य दिग्दर्शन या गाण्याला लाभलं आहे. त्यामुळे आता लग्न समारंभांमध्ये हे गाणं सहजपणे स्थान मिळवू शकणारं आहे यात शंका नाही.
‘त्या’ नियमांचे उल्लंघन केल्यास आता ट्रम्पच उपटणार पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे कान!
फोटोग्राफी स्पर्धेसाठी एक तरूण फोटोग्राफराला फोटो पाठवायचे असतात. त्यासाठी तो कोकणात जातो. त्याने कोकणात जाऊन एका मुलीचे फोटो काढलेले असतात. प्रत्यक्षात त्या फोटोत कुणीच दिसत नाही. पण, त्या फोटोग्राफरला त्या फोटोत मुलगी दिसत असते. या फोटोमागे काय कहाणी आहे, ती मुलगी कोण असते, या प्रश्नांची उत्तरं मोठ्या पडद्यावरच पाहायला मिळणार आहेत. निसर्गसंपन्न कोकणाच्या पार्श्वभूमीवरची एक गूढरम्य गोष्ट “छबी” या चित्रपटांतून मांडण्यात आली आहे.