Mirzapur 3 : ‘मिर्झापूर -3’ची काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या…
Mirzapur 3 Relaese Date OTT Platform: ‘मिर्झापूर 3’ची (Mirzapur 3) आतुरतेने वाट पाहणाऱ्या लोकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. वेब सिरीज रिलीजसाठी सज्ज आहे. ‘मिर्झापूर 3’ कधी प्रदर्शित होणार या सिरीजविषयी जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. (Mirzapur 3 Web series) मिर्झापूर 3 मध्ये सर्व जुन्या कलाकारांचा समावेश होणार का? मिर्झापूर 3 ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज होईल? मुन्ना भैया अजून जिवंत आहे का? सीरिजचे किती भाग असतील? असे सवाल अनेकांच्या मनात निर्माण झाल्या आहेत.
मिर्झापूर 3 रिलीज तारीख आणि ओटीटी प्लॅटफॉर्म
मिर्झापूर 3 दीर्घ प्रतीक्षेनंतर 5 जुलै रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे. या सिरीजची शेवटचे दोन भाग सुपरहिट झाले होते, त्यामुळेच आता लोक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
View this post on Instagram
मिर्झापूर 3 रिलीजची वेळ
पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, विजय वर्मा, रसिका दुग्गल यांच्या प्रमुख भूमिका असलेली गँगस्टर नाटक सिरीज गुरमीत सिंग यांनी दिग्दर्शित केली आहे आणि ती या वर्षातील बहुप्रतिक्षित सिरीजपैकी एक आहे. सिरीजच्या रिलीजच्या वेळेबद्दल सांगायचे तर, असे वृत्त आहे की त्याचे सर्व भाग मध्यरात्री स्ट्रीम केले जाणार आहेत.
मिर्झापूर 3 मध्ये किती एपिसोड असतील?
काही वेळापूर्वी मिर्झापूरचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा लोकांना तो खूप आवडला होता. यासोबतच यावेळी शोमध्ये किती एपिसोड असतील असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. मिर्झापूर सीझन 1 मध्ये 9 एपिसोड होते, तर दुसऱ्या सीझनमध्ये 10 एपिसोड होते. आता मिर्झापूर 3 मध्येही एकूण 9 किंवा 10 भाग असण्याची शक्यता आहे.
मुन्ना भैया मिर्झापूर 3 चा भाग असेल का?
जेव्हा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न होता की या हप्त्यात मुन्ना भैय्या दिसणार की नाही? तर याविषयी अशी माहिती समोर आली की मुन्ना भैया तिसऱ्या हप्त्यात दिसणार नाही, कारण त्याचा सीझन 2 मध्ये मृत्यू झाला आहे. याशिवाय ही भूमिका साकारताना त्याला गुदमरल्यासारखे वाटत होते.
Mirzapur 3: काय सांगता! ‘मिर्झापूरमध्ये पंचायतमधल्या सचिवजींची एन्ट्री? गुड्डू भैयाने केला खुलासा
मिर्झापूर 3 मध्ये जुने कलाकार असतील का?
असाही प्रश्न चाहत्याच्या मनात होता. तर समोर आलेल्या माहितीनुसार की दिव्येंदू शर्मा, विक्रांत मॅसी आणि श्रिया पिळगावकर यांच्यासह आठ कलाकार तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार नाहीत. याशिवाय पंकज त्रिपाठी, अली फजल, रसिका दुगल, श्वेता त्रिपाठी, हर्षिता गौर, ईशा तलवार, विजय वर्मा आणि अंजुम शर्मा आदी या शोचा भाग आहेत. या यादीत पंचायत फेम जितेंद्र कुमार म्हणजेच सचिव देखील छोट्या भूमिकेत दिसणार आहेत.