माध्यम-मनोरंजन क्षेत्रासाठी नवा टप्पा: प्रसारभारती अन् राज्य शासनात सामंजस्य करार

माध्यम-मनोरंजन क्षेत्रासाठी नवा टप्पा: प्रसारभारती अन् राज्य शासनात सामंजस्य करार

MoU between Prasar Bharati Industries Department and Maharashtra Film : मनोरंजन (Entertainment News) विश्वासाठी एक मोठी बातमी आहे. प्रसारभारती (Prasar Bharati), उद्योग विभाग आणि महाराष्ट्र, चित्रपट, रंगभूमी आणि (Maharashtra Film Theatre) सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार झाला (Cultural Development Corporation) आहे. आता माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात प्रकल्प उभारणी होणार आहे.

‘क्युँकी सास भी कभी बहू थी’ मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित!

सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ व प्रसारभारती, ब्रॉडकास्टिंग ऑफ इंडिया, आकाशवाणी, मालाड (पश्चिम) यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे.

विधानसभेतील पराभवावर अखेर उद्धव ठाकरे बोलले, थेट मविआवर फोडलं खापर!

यावेळी केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, अपर मुख्य सचिव विकास खारगे, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

ब्रॉडकास्टिंग ऑफ इंडिया, आकाशवाणी, मालाड (पश्चिम) यांच्या अखत्यारित असणाऱ्या 150 एकर जागेवर आगामी काळात प्रसारभारती, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि उद्योग विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने चित्रपट, मनोरंजन, माध्यम या क्षेत्रातील जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्राला जागतिक पातळीवरील प्रोडक्शन हबमध्ये स्थाने मिळविणे सुलभ होणार असून एकाच छताखाली माध्यम, प्रसारण, शिक्षण धोरणांची अंमलबजावणी करता येणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube