बापलेकाच्या नात्याची तरल गोष्ट ‘बापल्योक’ चा टीझर रिलीज; ‘या’ दिवशी येणार चित्रपट

बापलेकाच्या नात्याची तरल गोष्ट ‘बापल्योक’ चा टीझर रिलीज;  ‘या’ दिवशी येणार चित्रपट

Nagraj Manjule Baplyok : दिग्दर्शक नागराज मंजुळेने (Nagraj Manjule) मनोरंजन क्षेत्रात उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखले जात असतात. त्यांनी सतत त्यांच्या चित्रपटात गावाकडील कलाकृतींतून सिनेसृष्टीत एक मोठा ठसा उमटवला आहे. परंतु आता लवकरच नागराज मंजुळेंचा एक नवा चित्रपट (New Movie) चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘बापल्योक’ (Baplyok Marathi Movie) असे या मराठी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Nagraj Manjule Baplyok Marathi Movie Teaser Out )

‘त्या’ अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा खटला का नाही चालवत? जयंत पाटलांचा खडा सवाल…

कसा आहे ‘बापल्योक’ चा टीझर?

या टीझरमध्ये दुचाकीवर चाललेल्या बाप आणि लेकाचा संवाद सुरू आहे की, वडिलांची डोक्यावरची टोपी पडते ती घेण्यासाठी ते मुलाला गाडी थांबवायला सांगतात मात्र तो थांबवत नाही. तेव्हा त्यांच्यात हलका फुलका वाद होतो. तेव्हा तो मुलगा वडिलांच्या टोपीजवळ गाडी आणतो. त्यामुळे आता हा मुलगा वडिलांना टोपी उचलून देऊन मदत करणार की, त्या टोपीवरून गाडी नेणार हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

‘बापल्योक’ या सिनेमामध्ये बाप लेकाची एक हलकाफुलका प्रवास पाहायला मिळणार आहे. या सिनेमाद्वारे बाप आणि लेकाचा भावनिक विषय मोठ्या पडद्यावर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यामध्ये एक चौकोनी कुटुंब बघायला मिळणार आहे. यामध्ये एक मुलगा, त्याचे वडील, आई आणि बहिण बघायला मिळत आहे. यामध्ये ते सर्वजण त्या मुलाकडे कौतुकाने बघत असल्याचे बघत असल्याचे दिसून येत आहे.

Video : राजू शेट्टींनी माझे पंख छाटण्याचे प्रयत्न करु नयेत! तुपकरांचा नेतृत्वाला थेट इशारा

या सिनेमाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी केले आहे. तर ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे, आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या सिनेमाची निर्मिती केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. नागराज मंजुळे हे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘बापल्योक’ या सिनेमाची कथा विठ्ठल नागनाथ काळे यांनी लिहिली आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने आणि विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. येत्या २५ ऑगस्टला हा सिनेमा चाहत्यांना पाहायला मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube