भारतीय चित्रपटसृष्टीबाबत देसीगर्लचं वादग्रस्त विधान; म्हणाली, फक्त हिप्स अन् बुब्स…

भारतीय चित्रपटसृष्टीबाबत देसीगर्लचं वादग्रस्त विधान; म्हणाली, फक्त हिप्स अन् बुब्स…

Priyanka Chopra : बॉलीवुडसह हॉलीवुड देखील गाजवणारी अभिनेत्री देसी गर्ल प्रियंका चोप्रा आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे ओळखली जाते. त्याचबरोबर तिची आणखी एक ओळख म्हणजे ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. तर तिच्या सामाजिक, स्त्रियांविषयीच्या आणि चित्रपटसृष्टीविषयीच्या विधानांमुळे तिला अनेकदा कौतुकाची थाप मिळते. तर कधी आक्षेपार्ह विधानांमुळे ती वादात देखील सापडत असते. आता देखील ती अशाच एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आली आहे. (Priyanka Chopra controversial statement about Bollywood )

Sanjay Raut : शिंदेंची खुर्ची संकटात? राऊतांनी सांगितलं नेमकं राजकारण!

प्रियंकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती भारतीय चित्रपटसृष्टीबाबत बोलत आहे. मात्र यामध्ये तिने भारतीय चित्रपटसृष्टीबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. तिचा हा व्हिडीओ परदेशीतील आहे. त्यावेळी तिला पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना प्रियंका म्हणाली की, भारतीय चित्रपटांमध्ये फक्त स्त्रियांच्या हिप्स आणि बुब्सकडेच पाहिलं जात. भारतीय चित्रपटांमध्ये स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जात. असं प्रियंका म्हणाली आहे. तिच्या या विधानामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे.

अजितदादा हेच राष्ट्रवादीचे प्रमुख राहणार; भुजबळांनी पवारांना ठणकावले

दरम्यान गेल्या काही गेल्या काही दिवसाखाली दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियंकाने इंडस्ट्रीपासून लांब जाण्या पाठीमागचा मोठा खुलासा तिने यावेळी सांगितलं आहे. यावेळी तिने बॉलिवूडबाबत (bollywood ) एक धक्कादायक खुलासा केले होते. इंडस्ट्रीतील लोकांनी मला एका कोपऱ्यामध्ये ढकले होते. टिकून राहण्यासाठी मला लोकांबरोबर बीफ खावं लागलं होतं, अशी तक्रार तिने सांगितली होती.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये होत असलेल्या राजकारणाला वैतागून हॉलिवूडला गेल्याचा खुलासा तिने केला होता. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये देसी गर्लने एका दिग्दर्शकाबरोबरचा धक्कादायक किस्सा तिने यावेळी सांगितला आहे. शूटिंगच्या दरम्यान संबंधित दिग्दर्शकाने देसी गर्लला अंडरगार्मेंट्स पाहण्याची मागणी केली होती. देसी गर्लने दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, ही घटना 2002-2003 मधली घडली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube