Video : मुलगी एक वर्षाची होताच उपासनाने शेअर केला आठवणींना उजाळा देणारा खास व्हिडीओ

Video : मुलगी एक वर्षाची होताच उपासनाने शेअर केला आठवणींना उजाळा देणारा खास व्हिडीओ

Ram charan Wife Upasana Posted Video her girl is a year old : ग्लोबल स्टार रामचरण (Ram charan) आणि त्याची पत्नी उपासना कामिननेनी यांची मुलगी क्लिन करा कोडीनेला ही आज (20 जून) एक वर्षाची झाली आहे. यानिमित्त उपासना हीने खास व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रामचरण आणि उपासना यांच्या लग्नापासून ते मुलगी होण्यापर्यंतचा खास प्रवास दाखवण्यात आला आहे.

टॉलीवूडमध्ये 10 वर्षे पुर्ण, Rashi Khanna ने सांगितलं जिव्हाळ्याच्या चित्रपटाचं नाव

उपासनाने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये रामचरण आणि उपासनाच्या लग्नाच्या 11 वर्षानंतर जेवण घरामध्ये लहान मुल आलं तेव्हा मेगास्टार चिरंजीवी यांनी काय प्रतिक्रिया दिली होती कुटुंबासह चाहत्यांमध्ये कशाप्रकारे आनंदाचे वातावरण हे सर्व दाखवण्यात आला आहे.

यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलाचा पुढाकार! ज्येष्ठ नाट्यरसिकांसाठी विशेष सुविधा प्रदान

तसेच उपासनाने सांगितलं की.. जेव्हा आमच्या घरात लहान बाळ येणार होतं. त्यावेळी मला थोडीशी भीती देखील वाटत होती आणि आनंद देखील होत होता. तिच्या येण्याने आमचं कुटुंब पूर्ण झालं आहे. दरम्यान अभिनेता रामचरण याच्या आगामी चित्रपटांबाबत सांगायचं झालं. तर रामचरणच्या आरसी16 आणि आरसी 17 दोन चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे चाहते या चित्रपटां बाबत अत्यंत उत्सुक आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज