लाईफ इज सर्कल… रूपालीनी सांगितला रवींद्र महाजनींचा ‘तो’ खास किस्सा
Ravindra Mahajani Passed Away : ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं निधन झालं. ते शुक्रवारी पुण्यातील (Pune)तळेगाव दाभाडे या गावात घरी मृतावस्थेत सापडले आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. विविध स्तरांमधून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्याचवेळी रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर सिनेअभिनेत्री रुपाली भोसले (Rupali bhosle)हीने एक आठवण सांगून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.(Ravindra Mahajani Passed Away rupali bhosle shared emotional post instagram)
‘देखणा नट अन् माझा चांगला मित्र…; रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक मामा झाले भावुक
आई कुठे काय करते फेम रुपाली भोसले हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रवींद्र महाजनी यांच्यासोबतचे जीममधील फोटो शेअर करुन भावनिक पोस्ट लिहिली आहे. रुपालीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही एका जीममध्ये वर्कआऊट करायचो. त्यांच्या एका चित्रपटात काम करण्याची संधीही मला मिळाली. त्यांची स्टाईल त्यांनी कायम तशीच ठेवली होती. मी त्यांना कधीही भेटले तरी हँडसम हंक असे म्हणायचे, असेही रुपालीने पोस्टमध्ये लिहिले आहे.
आईचा फेवरेट हेरो मुंबईचा फौजदार या त्यांच्या चित्रपटाचा बॅनर माझ्या वडिलांनी तयार केला होता. त्यावेळी हॅन्ड प्रिंटिंग होत असे. आणि पप्पा प्रिंटिंग लाईनमध्ये होते. कॉम्प्युटर येईपर्यंत पप्पा स्वतः डिझाईन वगैरे करायचे. त्यावेळी त्यांनी या चित्रपटासाठी काम केलं होतं. मात्र त्यांची भेट कधी काकांसोबत झाली नाही. पण आपण म्हणतो ना की लाईफ इज सर्कल. तसंच झाले आणि मला त्यांच्या सोबत काम करायला मिळाले, अशी एक आठवण रुपाली भोसले हिने सांगितली आहे.
Ravindra Mahajani यांचा ‘हा’ सिनेमा शेवटचा ठरला! बाप लेकानं केलं होतं सोबत काम
महाजनी यांचा मावळ तालुक्यातील आंबी येथे बंद घरात मृतदेह आढळून आला आहे. महाजनी हे अनेक महिन्यांपासून येथे भाडेतत्त्वावर राहत होते. त्यांच्या घरातून वास येऊ लागल्यानंतर रहिवाशांनी ही माहिती पोलिसांना दिली.
अभिनेते रवींद्र महाजनी हे गेल्या नऊ महिन्यांपासून मावळमधील आंबीमधील एक्सब्रिया सोसायटीमध्ये राहत होते. ते एकटेच राहत होते. शुक्रवारी दुपारी घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजारील रहिवासांनी ही माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे.
महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मिरला पोलिसांनी ही माहिती दिली आहे.शवविच्छेदनंतर महाजनी यांचा मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.