Rubab Movie : स्क्रिप्ट असतानाही स्क्रिप्टशियाव घडला रुबाब! अनोख्या मेकिंग स्टोरीने ‘रुबाब’ चर्चेत
Rubab Movie : झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे
Rubab Movie : झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ‘तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे’ ही चित्रपटाची टॅगलाईन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, चित्रपटातील रुबाबदार जोडीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मात्र सध्या हा चित्रपट एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या मेकिंगमधील एक अनोखी बाब समोर आली आहे.
ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या कथेची झलक पाहायला मिळते, तसेच कलाकारांचा जबरदस्त अभिनयही दिसतो. कलाकारांच्या दमदार अभिनयामागे एक वेगळीच गोष्ट आहे. या चित्रपटासाठी कलाकारांना स्क्रिप्टच देण्यात आले नाही. कलाकारांनी २३ दिवस वेगवेगळ्या लोकेशन्सवर जाऊन रिहर्सल करून, वर्कशॉप करून या चित्रपटाचे शूटिंग केले मात्र, स्क्रिप्ट असूनही त्यांना स्क्रिप्ट मिळाले नाही. याचे कारण असे की, दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी प्रत्येक प्रसंग, संवाद आणि भावनिक पट त्यांच्या मार्गदर्शनातून सविस्तरपणे स्पष्ट केला, ज्यामुळे कलाकारांनी प्रत्यक्ष अनुभवातून सीन साकारले. या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे सेटवर सतत संवाद, चर्चा आणि सर्जनशील देवाणघेवाण सुरू होती. परिणामी, स्क्रिप्टपेक्षा समज, अनुभव आणि रिहर्सलवर आधारित अभिनयाची एक नवी प्रक्रिया ‘रुबाब’च्या निर्मितीत पाहायला मिळाली.
शरद पवार सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला हजर राहणार? पार्थ पवारांचा मनधरणीचा प्रयत्न-
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर निर्माते आहेत तर उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. या चित्रपटात संभाजी ससाणे व शितल पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ६ फेब्रुवारीपासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
