Samantha Ruth Prabhu: समांथा रुथ प्रभुने सांगितला डॉक्टरांनी दिलेला धक्कादायक सल्ला, म्हणाली…

Samantha Ruth Prabhu: समांथा रुथ प्रभुने सांगितला डॉक्टरांनी दिलेला धक्कादायक सल्ला, म्हणाली…

Samantha Ruth Prabhu Is Giving Dangerous Health Tips: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) गेल्या काही दिवसापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. समांथा एका आजारानं ग्रस्त आहे. त्यावर ती काही काळांपासून विविध उपचार घेत आहे. उपचार घेत असताना आपला धक्कादायक अनुभव ती सोशल मीडियाद्वारे (social media) सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. या आजारानी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना मदत व्हावी म्हणून ती तिनं घेतलेले उपचार अन् त्याच्या पद्धती अशा सगळ्याच गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहे.

अभिनेत्री समांथानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे टाकलेल्या एका पोस्टमधून तीन पानांची एक नोट शेअर केली आहे. त्यात तिने पर्यायी उपचार घेतल्यामुळे एका डॉक्टरनं तिच्यावर टीका केली आहे, याबद्दल अभिनेत्रीनं लिहिलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)


सामंथाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये टिप्स दिल्या

विनाकारण औषध घेण्याऐवजी नेब्युलायझरमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड आणि डिस्टिल्ड वॉटर वापरण्याचा सल्ला समंथाने दिला. तिने सांगितले की त्याचे मिश्रण जादूसारखे काम करते आणि अनावश्यक औषधे वापरणे टाळते. आता समंथाच्या या सल्ल्यावर डॉ. एबी फिलिप्स यांनी इन्स्टाग्रामवर अशी सूचना दिल्याबद्दल तिच्यावर सडेतोड टीका केली आहे.

डॉ. फिलिप्स यांनी समंथाच्या टिप्सला धोकादायक म्हटले

असा सल्ला दिल्याबद्दल डॉ.फिलिप्सने समंथाला आरोग्य आणि विज्ञानाबद्दल निरक्षर घोषित केले आहे. हायड्रोजन पेरोक्साईड स्निफिंगच्या धोक्यांबद्दल डॉक्टरांनी अमेरिकेच्या अस्थमा आणि ऍलर्जी फाउंडेशनच्या चेतावणीचा उल्लेख केला. डॉ. फिलिप्स यांनी जोर दिला की समाजात अशी कृत्ये करणे किंवा सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणे दंड आणि तुरुंगवास देखील होऊ शकते.

Samantha Ruth Prabhu: अभिनेत्रीचा चित्रपटसृष्टीला रामराम! नेमकं काय आहे प्रकरण? 

भारताचे आरोग्य मंत्रालय किंवा कोणतीही आरोग्य नियामक संस्था सोशल मीडियावर या प्रकारच्या चुकीच्या माहितीबाबत मुद्दे मांडतील की निष्क्रिय राहतील, असा सवालही डॉ. फिलिप्स यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube