सप्तसूर म्युझिकच्या म्युझिक व्हिडिओ निर्मितीची शंभरी पूर्ण! ‘हा’ शंभरावा म्युझिक व्हिडिओ लॉंच

सप्तसूर म्युझिकच्या म्युझिक व्हिडिओ निर्मितीची शंभरी पूर्ण! ‘हा’ शंभरावा म्युझिक व्हिडिओ लॉंच

Koi Aanewala Hai Music Video Launched : सप्तसूर म्युझिकच्या (Saptasur Music) म्युझिक व्हिडिओ निर्मितीची शंभरी पूर्ण झालीय. ‘कोई आनेवाला है’ (Koi Aanewala Hai) हा शंभरावा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आलाय. व्हिएतनाम येथे’कोई आनेवाला है’ हा म्युझिक व्हिडिओ लॉंच करण्यात (Entertainment News) आलाय.

मराठी संगीत क्षेत्रात म्युझिक व्हिडिओ हा प्रकार गेल्या काही वर्षांत सप्तसूर म्युझिकने पुनरुज्जीवित केलाय. सप्तसूर म्युझिकने म्युझिक व्हिडिओ निर्मितीमध्ये शंभरीचा टप्पा गाठला आहे. गायिका शयोनी बागची यांच्या ‘कोई आनेवाला है’ या गाण्याचा शंभरावा व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे.

IND vs ENG : रोहित शर्माने अनेक महिन्यांचा दुष्काळ संपवला; तुफान फटकेबाजी करत ठोकलं शतक

साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकने मराठी संगीत विश्वात सातत्याने वेगळ्या पद्धतीचे काम करत अनन्यसाधारण ओळख निर्माण केली आहे. म्युझिक व्हिडिओ या प्रकारात रोमँटिक म्युझिक व्हिडिओसह गणेशोत्सव, बोलीभाषांमधील गाण्यांच्या व्हिडिओची निर्मिती केली आहे. त्यामुळे सप्तसूर म्युझिकला सर्वदूर प्रतिसाद मिळाला आहे. या युट्यूब चॅनेलला 80 हजार सबस्क्रायबर्स आहेत.

वाळू माफियांचा आका मनोज जरांगे, त्याने करोडोंची वाळू चोरली; ओबीसी नेत्याचा मोठा आरोप

‘कोई आनेवाला है’ या शंभराव्या म्युझिक व्हिडिओतील गाणं गायिका शयोनी बागची यांनी गायलं आहे. विकास चौहान यांनी गीतलेखन, आकाश रिजिआ यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. म्युझिक व्हिडिओचं छायांकन रोहन कंटक, संकलन जान्हवी लाड यांचं आहे. व्हिएतनाम येथील नितांतसुंदर डोंगराळ परिसरात हा म्युझिक व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे. त्यामुळे सप्तसूर म्युझिकचा शंभर म्युझिक व्हिडिओच्या निर्मितीची वाटचाल एकूणच संगीत क्षेत्राला, नवोदितांना दिशा देण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या