Sidhhu Moosewala ची आई 58 व्या वर्षी पुन्हा झाली आई; वडिल बलकौर सिंहांकडून माहिती
Sidhu Moosewala : प्रसिद्ध दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची ( Sidhu Moosewala ) आई चरण कौर 58 व्या वर्षी पुन्हा आई झाली आहे. सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी आज सकाळी सोशल मीडियावर एक खास पोस्ट करत आपल्याला मुलगा झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी बाळाची पहिली झलक देखील चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
उद्धव ठाकरेंचे आदेश, दोघंही तातडीने मुंबईला या! खैरे-दानवेंचा वाद मिटणार की वाढणार?
या पोस्टमध्ये बलकौर सिंह यांनी लिहिला आहे की, शुभ दिपवर प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांच्या आशीर्वादाने आज त्याच्या धाकट्या भावाचे स्वागत करत आहोत. देवाच्या आशीर्वादाने बाळ सुखरूप आहे. सर्व हित चिंतकांनी दिलेल्या अपार प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. तसेच यामध्ये मागे सिद्धू मूसेवालाचा एक फोटो दिसत आहे. ज्यावर लिहिले आहे. लेजंड नेव्हर डाय.
विशेष म्हणजे सिद्धूची आई चरण कौर या 58 वर्षांच्या आणि वडील बलकौर सिंग हे 60 वर्षांचे असून त्यांनी गर्भधारणेसाठी आयव्हीएफचा वापर केला असल्याचं समोर आलं आहे. 2022 सालच्या मे महिन्यात गायक सिद्धू मुसेवालाची निर्घूणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ही हत्या करण्यात आल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर आता सिद्धू मुसेवालाच्या आईच्या गरोदरपणाच्या बातमीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
राजू शेट्टी स्वबळावर ठाम, आता महाविकास आघाडीने.. उद्धव ठाकरेंच्या भेटीत नक्की काय ठरलं?
दरम्यान, या बातमीमुळे 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला आयव्हीएफद्वारे मूल होऊ शकतात का? असे प्रश्न लोकांच्या मनात उपस्थिक केले जात आहेत. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. याला सर्वसामान्य भाषेत टेस्ट ट्यूब बेबी असेही म्हणतात. यामध्ये महिलेच्या अंडाशयातून अंडी बाहेर काढली जातात आणि पुरुषाच्या शुक्राणूसह फलित केले जातात. त्यानंतर तयार झालेला गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात ठेवला जातो. ज्या महिलांना नैसर्गिकरित्या मूल होऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे वरदान ठरले आहे.