विमानात वाद ते ओलाच्या संस्थापकावर आगडपगड; कुणाल कामराच्या वादाचा रोडमॅप कसा?

  • Written By: Published:
विमानात वाद ते ओलाच्या संस्थापकावर आगडपगड; कुणाल कामराच्या वादाचा रोडमॅप कसा?

Standup Comedian Kunal Kamra  And Controversies :  स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) व्यंगात्मक गाणं म्हणत शिंदेंचा गद्दार म्हणून उल्लेख केला. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, कामराने अशा प्रकारचे विधान करून वादाला तोंड फोडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीदेखील कामराने कधी विमानात तर, कधी सोशल मीडियावर वाद घातले आहेत. हे वाद नेमके काय याबद्दल जाणून घेऊया.

कुणाल कामरा यांनी मोदी सरकारच्या नव्या आयटी कायद्याला कोर्टात दिलं आव्हान; कोर्टाने सरकारला सुनावलं

‘शटअप कुणाल’ शोमुळे आला प्रसिद्धी झोतात

कुणाल कामरा हा एक स्टँडअप कॉमेडिअन असून, त्याने 2017 पासून युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मुलाखती घेण्यास सुरुवात केली होती. 2017 मध्ये ‘शटअप कुणाल’ हा कॉमेडी शो सुरु केला होता. ‘शटअप कुणाल’ या कॉमेडी शोमुळे तो प्रसिद्धीच्याझोतात आला. कुणालने ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरवील, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, उमर खालीद, कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवानी अशा दिग्गज मंडळींच्या मुलाखती घेतल्या आहेत.

बोलताना भान राखा, कारवाई होणार, कुणाल कामरा प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम

कुणाल कामराचे यापूर्वीचे वाद काय ?

कुणाल कामराची वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेकदा कुणाल त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादात सापडलाय. काही दिवसांपूर्वीच कुणालचा ओलाचे फाऊंडर भावेश अग्रवाल यांच्याशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर वाद घातला होता. ओलाच्या स्कूटर सर्व्हिसवरुन हा वाद झाला होता. कुणालने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही सातत्याने सडकून टीका केली आहे. तसेच तत्कालीन मुख्य न्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांच्यासह बॉलिबूडचा भाईजान असलेल्या सलमान खानचीही खिल्ली उडवली होती.

कोण गद्दार हे सिद्ध झालंय, कुणाल कामरा प्रकरणात CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

ओलावर काय म्हणाला होता कुणाल कामरा?

मध्यंतरीच्या काळात ओलाच्या गाड्यांमध्ये ग्राहकांकडून विविध तक्रारी मांडल्या जात होत्या. या सर्वांमध्ये कुणाल कामरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले होते की, ओला इलेक्ट्रिकने अद्याप ग्राहकांच्या तक्रारींचा विचार केला नाही. या समस्या सोडवण्यासाठी ते काय करणार आहेत हे आम्हाला माहीत नाही. तसेच ओला इलेक्ट्रिक स्कूटर्सचा फोटो पोस्ट करताना कुणाल कामराने लिहिले होते की, लोक सर्व्हिसची वाट पाहत असून,कंपनीने आपल्या ग्राहकांबाबत पारदर्शक प्लॅन तयार करावा असे कामरा म्हणाला होता.

यावर भावेश अग्रवाल यांनी पलटवार करत ही पोस्ट पैसे घेऊन केल्याची संतापजनक प्रतिक्रिया दिली होती. कुणाल कामरा त्यांच्या कॉमेडी करिअरमध्ये अपयशी ठरल्याचेही सांगितले. अशा पोस्ट लिहून ते पैसे कमवत आहेत. कुणाल कामरा माझ्यासोबत काम करू लागला तर मी त्याला यापेक्षा जास्त पैसे देईन, असेही ते म्हणाले होते.

हजारोंच्या उंचीवर असलेल्या विमानात घातला होता वाद

कुणाल कामराने सोशल मीडियासोबतच हवेत हजारोंच्या उंचीवर असलेल्या विमानातही वाद घातले आहेत. कुणालचा पत्रकार अर्णब गोस्वामी बरोबर विमानात वाद झाला होता. कुणाल आणि अर्णब 2020 मध्ये एकाच फ्लाईटमधून प्रवास करत होते. त्यावेळी कुणालने अर्णब जात असताना त्याच्याबाबत टिप्पणी केली होती. त्यानंतर इंडिगो, एअर इंडिया, गो एअर आणि स्पाईसजेटने कुणाल कामराच्या विमान प्रवासावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली होती.

कुणाल कामरा प्रकरण, शिवसैनिक आक्रमक सेटची तोडफोड अन् 40 जणांवर गुन्हा दाखल

लाखो फॉलोअर्स असणारा कामरा करतो 12 लोकांना फॉलो

कुणालच्या युट्यूब चॅनेलवर 2.31 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर त्याचे एक मिलिअन फॉलोवर्स आहेत. x या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे 2.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. पण कुणाल केवळ 12 लोकांना फॉलो करतो. यात कन्हैया कुमार, वरुण ग्रोवर, श्याम रंगीला यांचा समावेश आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube