Dono : सनीनंतर मुलगा राजवीरचा ‘दोनो’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Dono : सनीनंतर मुलगा राजवीरचा ‘दोनो’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Dono Release date : सनी देओलचा मुलगा राजवीर देओल आणि अवनीश एस बडजात्या यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या ‘दोनों’ या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा टीझर आणि गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे आता चित्रपट कधी रिलीज होणार? याची उत्सुकता वाढली आहे. त्यात आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार ? हे समोर आले आहे.

‘मविआ’कडून शाहू महाराज लोकसभा लढणार? आमदार सतेज पाटलांनी स्पष्टचं सांगितलं….

हा चित्रपट खास आहे कारण या चित्रपटातून दिग्दर्शक अवनीश एस बडजात्या दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहेत. तर दुसरीकडे पलोमा आणि राजवीर देओल या दोघांचं देखील या चित्रपटातून पदार्पण होणार आहे. राजवीर देओल हा प्रसिद्ध अभिनेते सनी देओल यांचा मुलगा आहे. तर पलोमा ही ज्येष्ठ अभिनेत्री पुनम धिल्लन यांची मुलगी आहे. या दोघांच्या जोडीला चाहत्यांनी पसंत केलं आहे. तसेच या चित्रपटातून सूरज आर बडजात्या यांचा मुलगा अवनीश एस बडजात्या देखील दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे.

‘घुमर’ ला मिळणार आणखी स्क्रीन्स; ‘गदर 2’, ‘ओएमजी 2’ च्या स्पर्धेत होणार मदत

त्यामुळे आता या खास पदार्पणाच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट डेस्टिनेशन वेडिंगच्या बॅकड्रॉपमध्ये घडलेली एक रोमॅंटीक प्रेमकथा आहे. राजश्री प्रोडक्शनच्या पारंपारिक चित्रपटांच्या यादीतच बसणारा हा एक कौटुंबिक चित्रपट असणार आहे. त्यामुळे त्यांच्या इतर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपट देखील तुम्ही कुटुंबासोबत पाहू शकता. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हा सिनेमा रोमँटिक आणि ड्रामा असणार असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमाचा टीझर देखील अतिशय सुंदर आणि रोमँटिक असल्याचे पाहायला मिळत आहे. या टीझरमध्ये मैत्रिणीच्या लग्नात दोन अनोळखी व्यक्ती भेटतात आणि मग त्यांची प्रेमकहाणी सुरूवात होत असल्याचे बघायला मिळाले आहे. राजश्री कॅम्पने दरवेळेप्रमाणेच या सिनेमात देखील रोमान्सचा भरणा केल्याचे बघायला मिळणार आहे. ‘मैने प्यार किया’ या सिनेमाच्या ३३ वर्षांनंतर राजश्री एका नव्या प्रेमकथेसह पुनरागमन केल्याचे बघायला मिळणार आहे. यादरम्यान त्यांनी अनेक रोमँटिक सिनेमा केले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube