दिपिका, नयनतारा नाही तर Tamanna Bhatia होती 1000 कोटींचा चित्रपट देणारी पहिली अभिनेत्री

दिपिका, नयनतारा नाही तर Tamanna Bhatia होती 1000 कोटींचा चित्रपट देणारी पहिली अभिनेत्री

Tamanna Bhatia : 1000 कोटींचा चित्रपट देणारी तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) ही पहिली अभिनेत्री होती. तिने एसएस राजामौली यांच्या उत्कृष्ट ‘बाहुबली 2’ मध्ये काम केलं होत. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. अनेक कारणांमुळे ती चर्चेत आली होती. या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर रु. 1,737 – रु. 1,810 कोटींची कमाई तर केली. पण सोबतीने तमन्ना 1000 कोटीचा चित्रपट करणारी पहिली महिला अभिनेत्री ठरली.

Sonam Kapoor च्या फॅशनचा जगात डंका! फॅशनमधील प्रतिष्ठितांच्या यादीत टॉप 40 मध्ये मिळवलं स्थान

50 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट रिलीजच्या वेळी 250 कोटी आणि अवघ्या काही दिवसांत 1000 कोटीची लक्षणीय कमाई करणारा चित्रपट ठरला. प्रभास, राणा दग्गुबती आणि अनुष्का शेट्टी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या बाहुबलीने तमन्नाला इंडस्ट्रीतील अनोखं स्थान निर्माण करून दिलं आहे. बाहुबली 2 ने जवान, पठाण आणि KGF 2 सारख्या इतर उत्कृष्ट चित्रपटांना मागे टाकत भरभरून प्रतिसाद मिळवला आणि 1000 कोटी क्लबमध्ये या चित्रपटाने एंट्री मारली.

Shivjayanti निमित्त डाक कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम! रक्तदान करत महाराजांना अभिवादन

या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत तमन्ना ला अनोखी ओळख तर दिली पण आशयसंपन्न चित्रपटाचा ती भाग बनली. 2005 मध्ये तिच्या करिअरची सुरुवात करणारी ही अभिनेत्री नंतर अनेक चित्रपटांमध्ये दिसली आणि लस्ट स्टोरीज 2, प्लॅन ए प्लॅन बी, बबली बाउन्सर, आखरी सच, जी कारदा आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये तिचे खूप कौतुक झाले.

तमन्ना भाटियाकडे आगामी काळात अनेक उत्तोत्तम प्रोजेक्ट्स आहेत. जॉन अब्राहमसोबत वेदा या चित्रपटात आणि अरणामनाई 4 नावाच्या तमिळ प्रोजेक्टमध्येही दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube