The Kerala Story कोटी-कोटी उड्डाणे; विरोधानंतरही चित्रपट ठरतोय सुपरहिट

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 02T114125.172

The Kerala Story Box Office Collection: ‘द केरळ स्टोरी’ (The Keral Story) या चित्रपट रिलीजअगोदर आणि रिलीजनंतर अनेक वादाला तोंड फुटले आहे. तर काही राज्यामध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली. पण रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला भरभरुन प्रेम मिळाले आहे. यामुळे बॉक्स ऑफिसवर मोठी जादू दाखवण्यात या चित्रपटाला यश आले आहे.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या रिलीजच्या नवव्या दिवशी 100 कोटींचा टप्पा पार केला होता. आता रिलीजच्या 12 व्या दिवशी या चित्रपटाने 150 कोटींचा आकडा देखील पार केला आहे. तसेच 2023 सालच्या ब्लॉकबस्टर चित्रपटात या सिनेमाचा समावेश झाला आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन 12 दिवस झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyansh (@shreyansh_kumar_)


आजही या चित्रपटाला चाहत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे उच्चांक गाठत असल्याचे दिसत आहे. ‘द केरळ स्टोरी’ने रिलीजच्या 12 व्या दिवशी 9.80 कोटी रुपयांची कमाई करण्यात आली आहे. आतापर्यंत रिलीजच्या 12 दिवसांत या चित्रपटाने 156.84 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. तसेच ‘द केरळ स्टोरी’ 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

यामुळे आता येत्या वीकेंडपर्यंत हा चित्रपट 200 कोटींच्या कल्बमध्ये सामील होऊ शकणार आहे, अशी निर्मात्यांना मोठी आशा आहे. 2023 मधील ‘द केरळ स्टोरी’ हा सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरणार आहे. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी हे मुख्य भूमिकेत आहेत. 40 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांनी धुरा सांभाळली आहे.

Tags

follow us