‘या’ दिवशी रिलीज होणार पोन्नियन सेल्वन 2, बाहुबली 2 शी असं आहे कनेक्शन

‘या’ दिवशी रिलीज होणार पोन्नियन सेल्वन 2, बाहुबली 2 शी असं आहे कनेक्शन

चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपट ‘पोन्नियन सेल्वन 1’ च्या यशानंतर आता पोन्नियन सेल्वन 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मणि रत्नमचा चोल साम्रज्यावर आधारित असलेला ‘पोन्नियन सेल्वन 1’ चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन आणि चियान विक्रम हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने जगभरात 500 कोटांची कमाई केली. त्यानंतर आता चाहते ‘पोन्नियन सेल्वन 2’ ची आतुरतेना वाट पाहत आहेत.

त्यातच आता दिग्ददर्शक मणि रत्नम यांनी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. तर यामध्ये आणखी एक ट्विस्ट म्हणजे चित्रपटाचं बाहुबली 2 शी कनेक्शन असणार आहे. या अगोदरच निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीजर शेअर केला होता. या टीजरमध्ये चित्रपटाशी संबंधित विविध पात्रांची छोटीशी झलक पाहायला मिळते. शेवटी राणी नंदिनीची भूमिका करणारी ऐश्वर्या राय आरशासमोर बसली आहे. PS-1 च्या या शक्तिशाली टीझरच्या शेवटी, निर्मात्यांनी रिलीजच्या तारखेचे अनावरण केले आणि सांगितले की PS-2 28 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. हा टीझर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले की, ‘हवेत तलवार फिरवण्यासाठी सज्ज व्हा, कारण आम्ही 28 एप्रिल 2023 ला येत आहोत.

मणिरत्नम यांनी आपल्या ऐतिहासिक चित्रपट ‘PS-2’ साठी तो दिवस निवडला आहे, ज्या दिवशी प्रभास आणि एसएस राजामौली यांचा चित्रपट ‘बाहुबली 2’ प्रदर्शित झाला होता. बाहुबली-2 28 एप्रिल रोजीच 2017 मध्ये रिलीज झाला आणि प्रभास-अनुष्का शेट्टी स्टारर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. आता याच दिवशी ऐश्वर्या रायचा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. PS-2 मध्ये राणी नंदिनीच्या सूडाची कथा पुढे नेताना दिसणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube