“मेकअप रुममध्ये बंद केलं अन्…”, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचे मालिकेच्या निर्मात्यावर गंभीर आरोप
Krishna Mukherjee Accuses Shubh Shagun Producer: कृष्णा मुखर्जी (Krishna Mukherjee) एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. ‘ये है मोहब्बतें’ या सर्वात लोकप्रिय डेली सोपमधून तिला अनोखी ओळख मिळाली. (Social media) मनोरंजन उद्योगात एक दशकाहून अधिक काळ केलेल्या तिच्या कारकिर्दीत तिने ‘नागिन 3’, ‘कुछ तो है: नागिन एक नए रंग में’, ‘शुभ शगुन’ आणि इतर प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. (Shubh Shagun Producer) अलीकडेच, कृष्णाने तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर ‘शुभ शगुन’च्या सेटवर आलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला.
View this post on Instagram
शुभ शगुनच्या निर्मात्यावर आरोप
कृष्णा मुखर्जीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली असून गेल्या दीड वर्षापासून ती खूप काही सहन करत असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी या विषयावर बोलण्याची हिंमत नव्हती, पण आता तो विषयी दाबून ठेऊ शकत नाही, असा निर्धार अभिनेत्रीने केला आहे. तिच्या पोस्टवर निर्माता कुंदन सिंगला टॅग करत अभिनेत्रीने धक्कादायक आरोप केला आहे की, तिला प्रोडक्शन हाऊस आणि निर्मात्याकडून वारंवार त्रास दिला जात आहे.
कृष्णाने पुढे लिहिले आहे की, “माझ्या मनात कधीच बोलण्याची हिंमत नव्हती, पण आज मी ठरवले की मी यावर भाष्य करणार नाही. मी कठीण काळातून जात आहे आणि गेली दीड वर्षे माझ्यासाठी अजिबात सोपे नव्हते. मी माझ्या आयुष्यातला शेवटचा शो “शुभ शगुन” करायला सुरुवात केली तेव्हा मी दुःखी होते. कुंदन सिंगने मला अनेकदा त्रास दिला.
निर्माताने मेकअप रूममध्ये बंद करून…
त्याच पोस्टमध्ये, कृष्णाने सांगितलं आहे की निर्मात्याने तिला मेकअप रूममध्ये बंद केले होते. कृष्णाने लिहिले की, “त्यांनी मला एकदा माझ्या मेकअप रूममध्ये बंद केले कारण मला बरे वाटत नव्हते आणि मी शूट न करण्याचा निर्णय घेतला होता. कारण ते मला माझ्या कामासाठी पैसे देत नव्हते आणि मी अस्वस्थ होते. जसे की त्यांनी मला 5 महिने पैसे दिले नाहीत आणि ते खरोखरच खूप धक्कादायक होते. यासाठी मी दंगलच्या कार्यालयात गेले होते मात्र तारेही यावर मला कोणी देखील सपोर्ट केले नाही.
कृष्णाला अनेकदा धमक्या आल्या
कृष्णाने पुढे सांगितले की, तिला अनेकदा धमक्या दिल्या गेल्या, त्यामुळे ती घाबरली आणि तुटून पडली. त्यांनी अनेक लोकांकडे मदत मागितली, पण कोणीही मदत करू शकले नाही, असे तिने यावेळी सांगितले. शिवाय, या अभिनेत्रीने असेही म्हटले की हेच कारण आहे की ती सध्या कोणत्याही शोमध्ये काम करत नाही, कारण तिला असे काही पुन्हा घडण्याची भीती आहे. त्यांनीही आपल्या पदरात न्याय मागितला आहे.
कृष्णाने कॅप्शनमध्ये आणखी एक नोट देखील लिहिली आहे की, ज्यामध्ये याबद्दल लिहिताना तिचे हात अजूनही थरथरत होते, परंतु तरीही तिने लिहले आहे. यामुळे ती चिंता आणि नैराश्याशी झुंज देत असल्याचे कृष्णाने शेअर केले. कृष्णाने पुढे लिहिले की, “आम्ही आमच्या भावना लपवतो आणि सोशल मीडियावर आमची चांगली बाजू दाखवतो. पण हे वास्तव आहे. माझे कुटुंबीय मला असे करू नका असे सांगत होते. या लोकांनी दुखावले तर काय होईल याची भीती वाटते म्हणून पोस्ट करायची? पण मी का घाबरू? हा माझा हक्क आहे आणि मला न्याय हवा असल्याचे अभिनेत्रीने यावेळी पोस्टमध्ये लिहिले आहे.
CM एकनाथ शिंदे यांना अनिल कपूरच्या ‘या’ भूमिकेची भुरळ, म्हणाले…
कृष्णा मुखर्जीच्या समर्थनार्थ अनेक अभिनेते-अभिनेत्री पुढे आले
कृष्णाने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करताच मोठ्या संख्येने लोक तिला पाठिंबा दर्शवू लागले. अभिनेत्री शिरीन मिर्झा म्हणाली, “मी तुला धीर आणि शांत राहण्याचा सल्ला देईन बाळा. मला आनंद झाला की तू याबद्दल सांगितलं कारण आम्ही तुला यातून न्याय देण्याचाही प्रयत्न करू. आता काही गंभीर कारवाई करण्याची वेळ आली आहे, खंबीर राहा.” तर अदिती भाटियाने देखील तिला सपोर्ट केला आहे.