Bawaal Teaser: रोमान्स, ड्रामा आणि इमोशन्स; जान्हवी आणि वरुणच्या ‘बवाल’ चा टीझर प्रदर्शित

Bawaal Teaser: रोमान्स, ड्रामा आणि इमोशन्स; जान्हवी आणि वरुणच्या ‘बवाल’ चा टीझर प्रदर्शित

Varun Dhawan & Janhvi Kapoor: वरुण धवन (Varun Dhawan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) स्टारर मोस्ट अवेटेड सिनेमा ‘बवाल’ची वाट पाहत असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सिनेमाच्या निर्मात्याने त्याच्या आगामी प्रोजेक्ट ‘बवाल’ची घोषणा केली आहे.बावल चित्रपटाच्या टीझरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 21 जुलै रोजी अॅमोझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)


‘छिछोरे’सारखा यशस्वी सिनेमा दिल्यानंतर साजिद नाडियादवाला आणि नितेश तिवारीची जोडी पुन्हा एकदा ‘बवाल’ घेऊन येत आहे. त्याला ‘छिछोरे’साठी सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे, तर निर्मात्यांनी ‘बवाल’च्या रिलीज तारखेबाबत ट्विटरवर देखील पोस्ट केले आहे, “राष्ट्रीय पुरस्कार विजेते साजिद नाडियादवाला आणि नितेश तिवारी ‘बवाल’सोबत पुन्हा एकदा परतले आहे. ६ ऑक्टोबर २०२३ रोजी तुमच्‍या जवळच्‍या सिनेमागृहांमध्‍ये त्‍यांची एपिक क्रिएकशन पहा! स्टारिंग वरुण धवन आणि जान्हवी कपूर.

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)


जान्हवी कपूर आणि वरुण धवनची ही नवीन जोडी रोमँटिक पीरियड अॅक्शन-ड्रामा ‘बवाल’मध्ये दिसून येणार आहे. याअगोदर हा सिनेमा ७ एप्रिल २०२३ या दिवशी रिलीज होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु VFX समस्यांमुळे ही रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. हा सिनेमा वरुण धवनच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा असल्याचे सांगितले जात आहे. नाडियाडवाला ग्रॅंडसनच्या बॅनरखाली साजिद नाडियादवाला यांनी ‘बवाल’ची निर्मिती केली आहे आणि अर्थस्काय पिक्चर्सची सह-निर्मिती केली आहे.

Shah Rukh Khan: अखेर किंग खान भारतामध्ये परतला! अपघातानंतर मुंबई विमानतळावर झाला स्पॉट

‘बवाल’ ही प्रेमकथा सांगितली जात आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एप्रिलमध्ये हा सिनेमा फ्लोरवर गेला होता. पॅरिस, बर्लिन, पोलंड, अॅमस्टरडॅम, क्राको, वॉर्सा तसेच भारतातही अशा ठिकाणी या सिनेमाची चित्रीकरण झाले आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाचे  अॅक्शन डायरेक्टर आणि स्टंटमॅन यांना जर्मनीतून नेमण्यात आले होते. सिनेमाच्या क्रूमध्ये ७०० हून अधिक लोक होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube