दूरदर्शनच्या ‘नुक्कड’ मालिकेत खोपडी ही भूमिका गाजवणारे अभिनेते समीर खक्कर यांचं निधन

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (36)

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर (Sameer Khakhar ) यांचे आज १५ मार्च रोजी निधन झाले आहे. ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर हे ७१ वर्षांचे होते. (Sameer Khakhar Passes Away) समीर खक्कर यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं होतं. पण ते ‘नुक्कड’ या टीव्ही मालिकेत खोपडी या भूमिकेकरिता विशेष ओळखले जात असत.

समीर खक्कर तब्बल ३८ वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये आपले कौशल्य दाखवले आहे. समीर यांनी दूरदर्शनवर काही लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये काम केलं होतं. ‘नुक्कड’, ‘मनोरंजन’, ‘सर्कस’, ‘नया नुक्कड’, ‘श्रीमान श्रीमती’ आणि ‘अदालत’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. सुरभी चंदना आणि नमित खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘संजीवनी’मध्ये ते शेवटचे ते दिसले होते.

मद्यधुंद अवस्थेत अमिताभ बच्चन यांना भेटायला गेला कपिल शर्मा, मग बच्चन यांनी….

अमेरिकेमधून परतल्यावर आपण चांगल्या भूमिकांच्या शोधात असल्याचे त्यांनी एकदा सांगितलं होतं. प्रत्येकजण कामाच्या शोधात असतो आणि मी देखील आहे. आणि काम शोधणे म्हणजे कामासाठी विचारणे आणि नोकरीसाठी अर्ज करणे होय. अभिनेत्यांच्या बाबतीमध्ये, प्रत्येक चित्रपट किंवा शो हा रोजचा व्यायाम आहे. मला आशा आहे की जे लोक मला चागलं ओळखतात ते मला कामाची ऑफर देतील. मला शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे. मला आयुष्यभर लोकांचे मनोरंजन करायचे आहे, मी अजून थकलो नाही,” असं समीर खक्कर एका कार्यक्रम दरम्यान म्हणाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार समीर खक्कर यांच्या पार्थिवावर आज बोरिवली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. मधल्या काही काळात समीर यांनी इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आणि ते अमेरिकेमध्ये स्थायिक झाले होते. नंतर, ते परत आले आणि त्यांनी पुन्हा काम सुरू केलं होत. समीर यांनी सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटात काम केलं होतं. शिवाय त्यांनी गुजरातीमधील काही नाटकांमध्ये देखील भूमिका केल्या होत्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube