Prabha Atre Passes Away: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन

Prabha Atre Passes Away: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन

Prabha Atre Passes Away: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे (Prabha Atre) यांचे पुण्यात निधन झाले. प्रभा अत्रे या भारतीय शास्त्रीय गायिका आहेत. 11 पुस्तकांचे प्रकाशन करण्याचा त्यांनी विश्वविक्रम नावावर केला आहे. प्रभा अत्रे यांना 1991 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देण्यात आला होता. प्रभा या शास्त्रीय परंपरेतील अव्वल गायकांपैकी एक आहेत. (Pune News) भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यात प्रभा अत्रे यांनी मुख्य भूमिका बजावली आहे. प्रभा अत्रे या अशा दुर्मिळ कलाकारांपैकी एक आहेत, ज्यांचे संगीताच्या अनेक वेगवेगळ्या शैलींवर प्रभुत्व आहे.

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पहाटे झोपेत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्या आधीच त्यांचं निधन झाल होतं. प्रभा अत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते भारतात आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होतं. प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका होते. संगीतक्षेत्रातील योगदानाविषयी भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ अशा अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

Nawazuddin Siddiqui: सैंधव सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अपघात, अभिनेता थोडक्यात बचावला

तसेच भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने देखील त्यांचा सन्मान करण्यात आला होता. प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात झाला आहे. वयाच्या 8व्या वर्षापासूनच त्यांना शास्त्रीय गायनाची आवड होती. संगीत शिकत असताना विज्ञान आणि कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका म्हणून प्रभा अत्रे यांची ओळख निर्माण झाली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभाताई अत्रे यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारे आहे. किराणा घराण्याच्या गायिका प्रभाताई अत्रे यांनी शास्त्रीय गायनातून देशभरातील रसिक नुसता मंत्रमुग्ध केला नाही, तर तो अधिक समृद्ध केला. ठराविक पठडीच्या बाहेर जाऊन गायनासाठी त्या ओळखल्या जात. नाविन्य हे त्यांच्या गायनशैलीचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या स्वरांना तप:श्चर्येचे बळ होते. केवळ गायन नाही तर आपले रसिक जाणकार असावेत, यासाठी त्यांनी लेखन सुद्धा केले. त्यांच्या संगीत सेवेसाठी त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ अशा तिन्ही पुरस्कारांनी गौरवान्वित केले.

गेल्याच महिन्यात 25 डिसेंबर 2023 ला पुण्यात त्यांना अटल संस्कृति पुरस्कार प्रदान केला, तेव्हा तीच शेवटची भेट ठरेल, अशी कल्पनाही नव्हती. त्यांना भेटणं, त्यांचं गाणं ऐकणं ही कायम विलक्षण अनुभूती असायची. भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी दिलेले योगदान शब्दात मांडणे अशक्य आहे. प्रभाताईंनी भारतीय शास्त्रीय संगीताची सेवा करताना नव्या गायक-गायिकांना घडविण्याचे कार्य केले. भारतीय संगीत त्यांचे कायम ऋणी राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि चाहत्यांना लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube