Zara Hatke Zara Bachke: ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट

Zara Hatke Zara Bachke: ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट

Zara Hatke Zara Bachke OTT Release: रोमँटिक कॉमेडी ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke Movie) गेल्या वर्षी रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. विकी कौशल (Vicky Kaushal) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. अनेक महिन्यांपासून चाहते या चित्रपटाच्या ओटीटी (OTT ) रिलीजची वाट पाहत होते. अखेर ‘जरा हटके जरा बचके’ आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कधी आणि कुठे पाहता येईल चला तर मग पाहूया…

ओटीटीवर ‘जरा हटके जरा बचके’ कधी आणि कुठे पहायचे

विकी कौशल आणि सारा अली खान यांच्या प्रेमाने भरलेल्या रोम-कॉम ‘जरा हटके जरा बचके’ ला थिएटरमध्ये प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कमी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपर हिट ठरला. ज्या प्रेक्षकांनी चित्रपटगृहात हा चित्रपट पाहिला नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, ते आता घरी बसून या चित्रपटाचा आनंद घेऊ शकणार आहेत. बऱ्याच महिन्यांनंतर ‘जरा हटके जरा बचके’ ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट 17 मे पासून म्हणजेच उद्यापासून जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.

अलीकडेच, जिओ सिनेमाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करून रिलीजची तारीख जाहीर केली होती. पोस्टमध्ये लिहिले होते, ‘सहकुटुंब विवाह होता, आता सहकुटुंब घटस्फोटही होईल. त्यामुळे तुम्ही सर्वांनी घटस्फोटासाठी यावे. जरा हटके जरा बचके 17 मे पासून Jio Cinema Premium वर स्ट्रीम होईल.

Karan Singh Grover अभिनयापलीकडे जाऊन कलात्मक बाजू जपणारा अभिनेता…

‘ओटीटी’च्या रिलीजमुळे विकी आणि सारा उत्साहित

चित्रपटाच्या ओटीटी प्रीमियरबद्दल बोलताना, विकी म्हणाला की, “जरा हटके जरा बचके डिजिटल पदार्पण करत आहे, याबद्दल मी खूप उत्साहित आहे, हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, “हा चित्रपट आधुनिक नातेसंबंधांचा एक नवीन विचार आहे जो हसण्याने भरलेला आहे प्रेम आणि सामाजिक भाष्य. “कपिलची भूमिका साकारणे हा एक आनंददायी अनुभव होता आणि मला विश्वास आहे की प्रेक्षकांना चित्रपटातील विनोद आणि संदेश नाकीयच आवडेल,” असे त्याने निवेदनात म्हटले आहे.

सारा म्हणाली, “जरा हटके जरा बचके मध्ये काम करणे खूप छान वाटले. सौम्य हे एक पात्र आहे, जे माझ्या हृदयाच्या जवळ आहे आणि आमची अपरंपरागत प्रेमकथा मोठ्या प्रेक्षकांना पाहायला मिळावी यासाठी मी खूप उत्सुक आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज