The Vaccine War Teaser: १५ ऑगस्टचं निमित्त साधून विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला; ‘द व्हॅक्सिन वॉर’चा रहस्यमय टीझर

The Vaccine War Teaser: १५ ऑगस्टचं निमित्त साधून विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला; ‘द व्हॅक्सिन वॉर’चा रहस्यमय टीझर

The Vaccine War Teaser Released: ‘द काश्मीर फाइल्स’ सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा बनवल्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Director Vivek Agnihotri) आता ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) घेऊन चाहत्यांच्या पुन्हा एकदा भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. या सिनेमाचा विषय खूप दिवसापासून चर्चेत होता. (Social media) याबद्दल विवेक अग्निहोत्री यांनी देखील अनेकवेळा सगळ्यांना अपडेट्स दिल्या आहेत. आता चाहत्यांच्या आतुरता आणखी ताणत त्यांनी ‘द व्हॅक्सीन वॉर’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

या सिनेमाच्या मेकर्सनी मंगळवारी, स्वातंत्र्यदिनी ‘द व्हॅक्सिन वॉर’चा टीझर प्रदर्शित केला आहे. जेव्हा देशभरात कोरोनाने थैमान घातलं होतं आणि बरेच लोक आजारी पडत होते, तेव्हा त्याच्याशी सामना करण्यासाठी देशात एक लस तयार करण्यात आली होती. त्या काळात कशाप्रकारे या संकटाला तोंड द्यावे लागले आणि डॉक्टरांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले आहेत, याची एक झलक या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

‘द व्हॅक्सिन वॉर’ हा भारतातील पहिला जैव-विज्ञान कथेवर आधारित सिनेमा आहे. जो भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चद्वारे कोणत्या पद्धतीने ही लस बनवली गेली, याचा छोटासा प्रवास दाखवले जाणार आहे. या सिनेमाच्या टीझरबरोबरच प्रदर्शनाची तारीख देखील डिक्लेर करण्यात आली आहे. या टीझरची सुरुवात एका वैज्ञानिकापासून होत आहे. नंतर औषधाची प्रथम चाचणी उंदरावर केल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच पल्लवी जोशीचा पहिला लूक समोर आला आहे, जी या सिनेमात शास्त्रज्ञाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.

Karan Kundra Look: स्वातंत्र्य दिनासाठी अभिनेता करण कुंद्राची अनोखी फॅशन पाहिली का?

यानंतर काही शास्त्रज्ञ लिफ्टच्या दिशेने जात असतात. आणि शेवटी , नाना पाटेकर यांची एन्ट्री झाल्याचे दाखवले आहे, जे गंभीर चेहऱ्याने उभे आहेत. तसेच अनुपम खेर देखील या सिनेमात झळकणार आहेत. परंतु त्यांचा लूक आणि त्यांच्याशी संबंधित व्हिडीओ अद्याप समोर आला नाही. या सिनेमाच्या टीझरबरोबर विवेक अग्निहोत्रीने सिनेमाची प्रदर्शित तारीख देखील जाहीर केली आहे. २८ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या दिवशी प्रभासचा ‘सालार’ सिनेमा देखील प्रदर्शित होत आहे. म्हणजेच बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा दोन मोठ्या सिनेमामध्ये टक्कर बघायला मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube