Ladaki Bahin Yojana : अजितदादांनी शेतावर जाऊन समजावली ‘लाडकी बहीण योजना’

Ajit Pawar : आज उपमुख्ममंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट बांधावरून जाऊन महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना (Ladaki Bahin Yojana ) समजावली.

महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याची सरकारने घोषणा केली.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.

दरम्यान, अर्ज करताना महिलांना अनेक अडचणी येत आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया वेगाने होत नसल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी अजित पवारांनी शेतात राबणाऱ्या या महिलांच्या सगळ्या अडचणी समजून घेतल्या

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याचं आवाहनही अजित पवारांनी केलं.
