सुरक्षित लँडिंग, डॉल्फिनकडून खास स्वागत … सुनीता विल्यम्सच्या परतीचा ऐतिहासिक क्षण पहा

- नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुरक्षित परतल आहे.
- भारतीय वेळेनुसार आज (19 मार्च) पहाटे 3.30 वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्याने सुनीता विल्यम्स सुरक्षितपणे उतरले
- स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानात चढण्यासाठी, अंतराळवीरांनी प्रथम प्रेशर सूट घातले. हॅच बंद करण्यात आला आणि नंतर गळती तपासण्यात आली. यानंतर अनडॉकिंग प्रक्रिया सुरू झाली
- सुनीता विल्यम्स यांनी 10:35 (IST) वाजता अंतराळयानातून अनडॉक केले
- अनडॉक करण्यापूर्वी, अंतराळयानातील लाईफ सपोर्ट सिस्टम, कम्युनिकेशन आणि थ्रस्टर सिस्टमचे काम तपासण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात अंतराळयानाचे कुलूप उघडण्यात आले. यामध्ये, अंतराळयानाला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी जोडणारे सांधे उघडले जातात. तिसऱ्या टप्प्यात, अनडॉकिंग सिस्टम उघडल्यानंतर, थ्रस्टर वापरून अंतराळयान ISS पासून वेगळे करण्यात आले.
- पहिले दोन ड्रॅगन पॅराशूट पृथ्वीपासून 18,000 फूट उंचीवर उघडले आणि नंतर मुख्य पॅराशूट 6,000 फूट उंचीवर उघडले, ज्यामुळे ड्रॅगन कमी वेगाने पाण्यात उतरला.
- जेव्हा हे ड्रॅगन कॅप्सूल समुद्रात उतरले तेव्हा जेव्हा सुनीता विल्यम्सच्या कॅप्सूलला अनेक डॉल्फिनने वेढले होते.
- जहाजाने अंतराळवीरांना कॅप्सूलमधून बाहेर काढले आणि सध्या त्यांना 45 दिवसांच्या रिहैब कार्यक्रमासाठी ह्यूस्टनमधील केंद्रात पाठवले आहे.