राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान, उमेदवारांसह दिग्गजांनी बजावला मताधिकार, पाहा फोटो…

देशासह राज्यामध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

यामध्ये राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.

त्यासाठी तेथील उमेदवारांसह दिग्गज नेत्यांनी मतदानाचा अधिकार बजावला त्याचेच हे काही फोटो पाहूयात.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी मतदानाचा हक्क बजावला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पडळकरवाडी ता. आटपाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर मतदानाचा हक्क बजावला...

सांगलीचे कॉंग्रेसमध्ये बंडखोरी करून अपक्ष उभे राहिलेले विशाल पाटील यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

त्यानंतर सांगलीचे महायुतीचे उमेदवार भाजपचे संजय काका पाटील यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला

तर हातकणंगले येथे महायुती आणि शिंदे गटाचे उमेदवार असलेले धैर्यशील माने यांनी मतदानाचे फोटो शेअर केले

तर महाविकास आघाडीकडून हातकणंगले चे उमेदवार असलेले ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरूडकर यांनीही मतदान केलं.

तसेच तिरंगी लढत असलेल्या हातकणंगले मतदारसंघातील तिसरे महत्त्वाचे उमेदवार म्हणजे स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष आणि उमेदवार राजू शेट्टी यांनीही मतदानाचा अधिकार बजाव

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी त्यांच्या मूळ गावी लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान केले.

तर जेनेलिया आणि रितेश देशमुख यांनी मतदानानंतर नागरिकांना मतदान करण्याचा आवाहन केलं

राज्यातील सर्वात हाय व्होल्टेज लढत मानल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार
