आज वाढदिवस असलेल्या ‘या’ अभिनेत्याला ओळखत? पाहा बालपणीचे गोंडस फोटो

या लहान मुलाचा फोटो पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा लहानगा नेमका कोण आहे?

हा चिमुकला दुसरा तिसरा कोणी नसून जगभरात गाजणारा दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण आहे.

अभिनेता रामचरण चा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त त्याचे हे बालपणीचे काही खास फोटो पाहूयात

रामचरण सध्या त्याच्या आरसी 16 या चित्रपटाच्या कामामध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट बुच्ची बाबू सना हे दिग्दर्शित करत आहेत.

दरम्यान रामचरण आणि पुष्पा या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार हे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.

या अगोदर त्यांनी 2018 ला रंगस्थलम या ब्लॉकबस्टर चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही हिट जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाढदिवसानिमित्त अभिनेता रामचरणने तिरुमला येथे तिरुपती मंदिराला भेट दिली.

यावेळी त्याची पत्नी आणि चिमुकली देखील त्याच्यासोबत बालाजीचे चरणी लीन झाल्या.

जून महिन्यात या जोडप्याला लग्नाच्या 11 वर्षांनंतर राम चरण आणि उपासना आई-बाबा झाले आहेत.

उपासनाने 20 जून 2023 रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला.

राम चरण आणि उपासना 14 जून 2012 रोजी लग्नबंधनात अडकले होते.

राम चरणला 'आरआरआर' सिनेमासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले

राम चरणचा ‘द इंडिया हाऊस’ हा सिनेमा लवकरच चाहत्यांचा भेटीला येणार आहे.

तसेच त्याचा ‘गेम चेंजर’ हा सिनेमा देखील चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज होत आहे.

राम चरण आणि कियारा अडवाणी ‘गेम चेंजर’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

हा चित्रपट या वर्षी सप्टेंबरमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
