Sonakshi Sinha Wedding चे खास फोटो; सोनाक्षी-झहीरकडून नव्या प्रवासाला सुरूवात

गेल्या काही वर्षापासून शत्रुघ्न सिन्हा यांची लेक अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल हे रिलेशशीपमध्ये होते.

रविवारी (23 जून) सोनाक्षी झहीर इक्बाल सोबत विवाह बंधनात अडकली आहे. नोंदणी पद्धतीने दोघांनी लग्न करून त्यांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरूवात केली.

सोनाक्षी आणि झहीरचा विवाह सोहळा दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडला. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाआधीचे विधी शुक्रवारपासून सुरु झाले होते.

पहिल्या दिवशी मेहंदी सोहळा पार पडला. यानंतर शनिवारी सोनाक्षीच्या घरी म्हणजेच मुंबईतील ‘रामायण’ बंगल्यात खास पूजा ठेवली होती आणि आज दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं.
